स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे ''कथ्थक'' नृत्य स्पर्धेमध्ये यश
esakal January 29, 2026 10:45 AM

swt283.jpg
20471
सावंतवाडी ः कथ्थक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसोबत रुजुल पाटणकर व इतर.

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे
‘कथ्थक’ नृत्य स्पर्धेमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या शास्त्रीय नृत्य ''कथ्थक'' च्या प्रारंभिक परीक्षेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकाल लावत देदीप्यमान यश संपादन केले आहे.
यात तिसरीमधील क्रिशा साळवी हिने विशेष श्रेणी, ऋत्वी पेंडसे, राधिका शेटकर, राज्वी गोंदावळे, अस्मी सावंत व आराध्या गावडे यांनी प्रथम श्रेणी, चौथीमधील प्रार्थना नाईक व अनोमा कामत यांनी विशेष श्रेणी, तर पारिधी निकम हिने प्रथम श्रेणी प्राप्त केली. पाचवीमधील ऐश्वर्या तेली, धन्यवी शृंगारे, जान्हवी तुळसकर यांनी विशेष श्रेणी, सई नाईक, गायत्री तनावडे, जान्हवी जानकर, लावण्या केसरकर, नीलया शिंदे, नुवैरा सैय्यद व याश्विनी खवणेकर यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थिनींना प्रशालेच्या व नृत्यांगण कथ्थक क्लासेसच्या संचालिका कश्मिरा पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक ऋजुल पाटणकर, संचालिका कश्मिरा पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी कौतुक केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.