आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचं नातं संपुष्टात, 10 वर्षांच्या संसाराचा काडीमोड? सेलिब्रिटी पत्नीच्या पोस्टमुळे खळबळ
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क January 29, 2026 12:13 PM

Gaurav Khanna Akanksha Chamola Divorce Rumors: सध्या मनोरंजन विश्वात (Entertainment World) संसार मोडण्याचा ट्रेंड सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यासाठी कारण ठरतंय सेलिब्रिटींचे (Celebrity Couple) एकापाठोपाठ मोडणारे संसार. अशातच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा संसार मोडल्याचं बोललं जात आहे. लग्नाच्या तब्बल दहा वर्षांनी या सेलिब्रिटी जोडप्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. अचानक या चर्चा सुरू झाल्या त्यासाठी कारण ठरतेय अभिनेत्रीची पोस्ट. या पोस्टमध्ये तिनं असं काही लिहिलंय जे वाचून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. 

आम्ही ज्या सेलिब्रिटी जोडप्याबाबत सांगतोय ते जोडपं म्हणजे, 'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola). ऐकून धक्का बसला ना? 'बिग बॉस 19' चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचं कारण त्याचा नवा शो नाही तर, त्याचं वैयक्तिक आयुष्य आहे. बिग बॉसमध्ये आल्यापासूनच गौरव खन्ना आणि त्याच्या बायकोच्या जोरदार चर्चा रंगलेल्या. पण, आता या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चांनी चाहते पुरते हादरुन गेले आहेत. 

आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, जर सर्व काही ठीक होतं, तर अचानक ही बातमी कुठून आली? या चर्चा सुरू झाल्यात गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे. घटस्फोट आणि विभक्त होण्याच्या या चर्चा सुरू झाल्यात. तेव्हापासून, गौरव आणि आकांक्षाचे चाहते चिंतेत आहेत, त्यांना आश्चर्य वाटतंय की, दोघांमध्ये खरोखर काहीतरी बिनसलंय का?  

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोलाची पोस्ट (Akanksha Chamola Social Media Post)

आकांक्षा चमोलानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिनं लिहिलंय की, "जिस रिश्ते की बुनियाद जरूरतें होती हैं, वहां दिल हमेशा कुर्बान होता है..." त्यासोबतच तिनं एक कॅप्शन देखील लिहिलंय. ज्यामध्ये तिनं स्पष्ट केलं आहे की, जब उन्हें लगा कि वे तैयार हैं तो वे असल में तैयार नहीं थे... आकांक्षानं लिहिलंय की, "जब हमें लगा कि हम तैयार हैं, तो हम नहीं थे..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akanksha Chamola (@akankshagkhanna)

'बिग बॉस 19'मध्ये फॅमिली प्लानिंगचा उठवलेला मुद्दा 

फॅमिली वीक दरम्यान जेव्हा आकांक्षा 'बिग बॉस 19'च्या घरात दाखल झाली, तेव्हा तिनं मुल न होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितलं. तिनं तिच्यावर येणाऱ्या दबावाबद्दल आणि तिला लावण्यात येणाऱ्या लेबल्सबद्दल सांगितलं. तिनं सांगितलेलं की, हा एक मोठा निर्णय होता, ज्यासाठी वेळ लागत होता आणि ती भविष्यात मुल जन्माला घालण्याचा विचारही करू शकत नाही... आकांक्षा म्हणालेली की, "मला याची भीती वाटत नाही. मुलाला जन्म देणं हे सोपं काम नाही. ही एक मोठी जबाबदारी आहे. मला वाटत नाही की, मी ते काम इतक्या चांगल्या प्रकारे हाताळू शकेन... या वयात, कोणत्याही वयात... मला माझं करिअर घडवायचंय, माझ्याकडे खूप महत्त्वाकांक्षा आहेत, जरी लोक स्वार्थी म्हणत असले तरी..."

आकांक्षाच्या पोस्टवर लोकांचे रिअॅक्शन्स

सोशल मीडिया युजर्स या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही जण म्हणतात की, ही आकांक्षाच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा असू शकते, तर काहीजण आकांक्षा आणि गौरवमध्ये बिनसल्यामुळे घटस्फोटाचा अंदाज लावत आहेत.

 

Arijit Singh : अरिजीत सिंहचा गायक म्हणून निवृत्तीचा निर्णय, यापुढे कोणतंही गाणं गाणार नाही, सोशल मीडियावरुन घोषणा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.