कडेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या आज शेवटच्या दिवशी संपूर्ण तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून ही निवडणूक आता काँग्रेस व भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
येथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा ‘हाय व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. चार जिल्हा परिषद गटांसाठी दाखल ३६ उमेदवारांपैकी तब्बल २६ जणांनी माघार घेतल्याने आता चार जागांसाठी १० उमेदवार मैदानात उतरले आहेत. पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये दाखल ८८ अर्जांपैकी ६३ अर्ज माघारी गेल्यामुळे ८ जागांसाठी २५ उमेदवार थेट निवडणूक मैदानात आहेत.
Miraj ZP - PS : मिरज तालुक्यात निवडणुकीचा रणसंग्राम; ९४ उमेदवार, पंचरंगी लढतींनी राजकारण तापलेकाँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम कदम प्रचाराची सूत्रे घेतली आहेत. दुसरीकडे भाजप नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काही गटांत मनसे, शिवसेना (शिंदे गट) आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
गट व गणनिहाय लढती पुढीलप्रमाणे :तडसर गट : मंदाताई करांडे (भाजप), वैशाली मुळीक (काँग्रेस). तडसर गण : रणजित पवार (काँग्रेस) विजय भोसले (भाजप), सतीश येताळ (मनसे), आकाश वाघमारे(अपक्ष) शाळगाव गण : सुप्रिया करांडे (काँग्रेस), प्रियांका पाटील (भाजप). कडेपूर गट : शकुंतला पिंगळे (भाजप), विद्या कुंभार(काँग्रेस).
Sangli Election : जयंत पाटील विरुद्ध जितेंद्र पाटील प्रभावाची कसोटी; बोरगावमध्ये राजकीय हालचाली गतिमानकडेपूर गण : पूनम माळी (भाजप), सुवर्णा रूपनर (काँग्रेस) हिंगणगाव बुद्रुक गण : डॉ. जितेश कदम (काँग्रेस), प्रा. आशिष घार्गे (भाजप) वांगी गट : प्रियांका महाडिक (काँग्रेस), स्नेहा महाडिक(भाजप), सुजाता होवाळ रिपाइं (ए), रुपाली महाडिक (अपक्ष). वांगी गण : राजकुँवर सूर्यवंशी (काँग्रेस), मनीषा पाटील (भाजप), सुनंदा कदम (शिवसेना शिंदे गट), निशिगंधा शिंदे (मनसे), सुप्रिया माळी(अपक्ष).
नेवरी गण : डॉ. विजय महाडिक (काँग्रेस), लक्ष्मण कणसे (भाजप), सचिन सावंत (शिवसेना शिंदे गट), विजय माळी (अपक्ष), सयाजीराव सकट (अपक्ष).
देवराष्ट्रे गट : आशा गावडे (काँग्रेस), अंजना होनमाने (भाजप). देवराष्ट्रे गण : भारती मिसाळ (काँग्रेस), रुपाली मिसाळ(भाजप), पूनम गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी). चिंचणी गण : दिग्विजय कदम (काँग्रेस), कुलदीप औताडे(भाजप).