Sankarshan Karhade Emotional Post After Ajit Pawar Death: बारामतीत (Baramati News) विमान कोसळून घडलेल्या दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. अजित पवारांच्या (Ajit Pawar) अकाली एग्झिटनं फक्त राजकीय विश्वच नाहीतर, अवघा देश हळहळला आहे. अशातच कलाविश्वातूनही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच मराठी अभिनेता संकर्षण कराडे यानं एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे (Marathi Actor Sankarsan Karade) यानं शोक व्यक्त करत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यानं म्हटलं आहे की, "मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी. काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. त्यातले अजितदाद पवार हे तसे आधार वाटायचे. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती. त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो. अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. अजित दादा.. खूप आठवण येत राहील..."
View this post on Instagram
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथे झाला. ते आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त काळ उपमुख्यमंत्री राहिले. त्यांनी बी. कॉम या पदवीचं शिक्षण घेतलं. नंतर शेती व्यवसाय सांभाळत अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वित्त, नियोजन, ऊर्जा जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती प्रभावीपणे हाताळली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळातून तसेच सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत अनेक दिग्गज आले आहेत. राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, महाराष्ट्रातील अनेक कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे आमदार, ज्यात झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक आणि अनेक मान्यवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आहेत. विद्या प्रतिष्ठान इथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोल्हापूर, बारामती, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि इतर ठिकाणांहूनही लोक येत आहेत.