साहित्य-
बासमती तांदूळ-१ कप
तूप -२ मोठे चमचे
दूध- १/४ कप (केशर भिजवलेले)
केशर-१०-१२ काड्या
सुका मेवा काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे
ताजी फळे- डाळिंबाचे दाणे, सफरचंदाचे काप
खडा मसाला- तमालपत्र, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, शहाजिरे
कांदा-१ मोठा लांब चिरलेला आणि कुरकुरीत तळलेला
आले-लसूण पेस्ट-१ छोटा चमचा
साखर किंवा मध-१ छोटा चमचा
मीठ चवीनुसार
कृती-
सर्वात आधी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर पाणी उपसून घ्या. आता कोमट दुधात केशर भिजत ठेवा, जेणेकरून पुलावला छान पिवळसर रंग आणि सुगंध येईल. आता कुकरमध्ये किंवा कढईत तूप गरम करा. त्यात काजू, बदाम आणि बेदाणे हलके सोनेरी होईपर्यंत तळून बाजूला काढून ठेवा.
उरलेल्या तुपात शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची टाका. मसाल्यांचा सुगंध सुटला की त्यात आले-लसूण पेस्ट घालून परता. आता भिजवलेला तांदूळ घालून २-३ मिनिटे हलक्या हाताने परता, जेणेकरून तांदूळ तुपात छान कोट होईल.
तांदळाच्या दुप्पट पाणी आणि केशरचे दूध त्यात ओता. चवीनुसार मीठ आणि १ चमचा साखर घाला. कुकरला मध्यम आचेवर २ शिट्ट्या करून घ्या. तांदूळ जास्त शिजून लगदा होणार नाही याची काळजी घ्या. पुलाव तयार झाला की तो एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यावर तळलेला कुरकुरीत कांदा, तळलेला सुका मेवा, डाळिंबाचे दाणे आणि सफरचंदाचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.
ALSO READ: स्वादिष्ट कॉर्न पुलाव रेसिपी
खास टिप्स
सफरचंद किंवा डाळिंब नेहमी पुलाव सर्व्ह करण्यापूर्वीच टाका, अन्यथा फळे गरम वाफेमुळे मऊ पडतात.
काश्मिरी पुलावला अधिक रिच टेस्ट हवी असेल, तर पाणी आणि दूध ५०:५० प्रमाणात वापरू शकता.
कांदा कुरकुरीत तळण्यासाठी त्यात चिमूटभर साखर घालून तळा, यामुळे रंग छान येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: डिनरमध्ये बनवा स्वादिष्ट असा काजू-किशमिश पुलाव पाककृती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: डिनरसाठी नक्की ट्राय करा कोफ्ता पुलाव