PGR26B03399
कासारवाडी ः येथे प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन करताना विद्यार्थी व शिक्षक.
जिल्हा परिषद शाळा, कासारवाडी
पांगरी : कासारवाडी (ता.बार्शी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध प्रभातफेरीने झाली. लेझीम व देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेविका एम.टी.सोनवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर शहीद विठ्ठल खांडेकर स्मारकासमोर शिवाजी गुंड यांनी तर शाळेत मुख्याध्यापक सुधाकर विठ्ठल बडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. संगीत कवायत व तालबद्ध लेझीम सादर करण्यात आली. प्रास्ताविकात बाळासाहेब मुंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. माजी विद्यार्थी अमित शिंदे यांनी सुमारे ६० हजार रुपये किमतीचा संगणक भेट दिला. तर शहीद मेजर विठ्ठल रामा खांडेकर यांच्या कुटुंबीयांनी शाळेस फॅन भेट दिला.