उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका महापौर नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव असून महापौर निवडणूक (Mayoral election) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे .कोण होणार महापौर उल्हासनगर महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे. शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक असून महापौर पद टीम ओमी कलानीकडे जाणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात रंगली आहे. उल्हासनगर महापालिका एकूण प्रभाग २० असून ७८ जागांसाठी निवडणूक पार पडली. भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. ७८ जागांपैकी शिंदे गटाला २२ जागांवर विजय मिळाला तर टीम ओमी कलानी सोबत युती असल्याने कलानी यांना १४ जागांवर यश मिळाले. (Mayoral election)
भाजपला ७८ जागांपैकी ३७ जागा मिळाल्या भाजपने काँग्रेसच्या एक उमेदवार सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला . शिवसेना शिंदे गटाने वंचित आघाडी आणि अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेसाठी दावेदार असल्याचे सांगितले जातेय.(Mayoral election)
शिंदे गटाकडे एकूण जागा 40
भाजप – 37, काँग्रेस – 1 -38
टीम ओमी कलानी – 14 + 1 अपक्ष-15
शिवसेना शिंदे गट – 22 + साई पक्ष 1 + वंचित 2-एकूण 25
असे मिळून शिंदे गटाकडे 40 जागा आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ असूनही महापौर पद टीम ओमी कलानी गटाला देण्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून राजेश चानपूर, राजेंद्र चौधरी आघाडीवर आहेत, तर टीम ओमी कलानी गटाकडून अश्विनी निकम, डिंपल ठाकूर चर्चेत आहेत. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे घेणार असल्याची माहिती आहे. महापौर पद शिवसेनेकडे की टीम ओमी कलानीकडे? याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे असल्याने एकमेव शिवसेना शिंदे गटाकडे दोन नगरसेवक असल्याने कोणाला महापौर पदावर विराजमान केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजपाची कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये युती आहे. त्यातच शिवसेनेला मनसेने साथ दिल्याने मनसेकडे एक महिला नगरसेविका अनुसूचित जमाती मधील आहे. शिवसेना शिंदे गटात दोन गट निर्माण झाले आहेत. एका गटात किरण भांगले यांना महापौर पदी विराजमान करण्यासाठी जोर लावला जात आहे, तर दुसऱ्या गटाकडून हर्षाली थविल यांना महापौर पदी विराजमान करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. आज महापौर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. किरण भांगले की हर्षाली थविल कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामिर्देशन पत्र कोण दाखल करणार की महापौर निवडणूक बिनविरोध होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.