TV Show Rimjhim Faces Backlash Over Intimate Scene: टेलिव्हिजनच्या (Televison News) जगात, सतत असं काही ना काही घडतं, जे चाहत्यांना गोंधळात टाकतं. कधी, टीव्ही सीरिअल्सच्या (TV Serials) कथानकावरून वाद निर्माण होतो, तर कधीकधी, एखाद्या दृश्यामुळे वाद निर्माण होतो. असाच काहीसा वाद एका नव्या टीव्ही मालिकेमुळे निर्माण झाला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी निर्मात्यांना फैलावर घेतलं आहे.
'रिमझिम: छोटी उमर बडा सफर' (Rimjhim Chhoti Umra Bada Safar) ही टीव्ही सीरिअल एका मोठ्या वादात अडकली आहे. या शोच्या नव्या भागात शोची अल्पवयीन अभिनेत्रीनं तिच्या सह-कलाकारासोबत इंटीमेट सीन दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. टीव्ही सीरिअलमध्ये दाखवण्यात आलेला हा सीन व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. ही सीरिअल एक अल्पवयीन मुलगी आणि एका प्रौढ पुरूषाच्या प्रेमसंबंधावर केंद्रीत आहे. या सीरिअलमध्ये 16 वर्षीय अभिनेत्री यशिका शर्मा आणि 24 वर्षीय हिमांशू अवस्थी मुख्य भूमिकेत आहेत.
'रिमझिम' मालिकेचा नवा भाग बुधवारी, 28 जानेवारी रोजी दंगल टीव्हीवर प्रसारित झाला. यात एक सीन आहे, ज्यात हिमांशूचं पात्र म्हणजेच, समीर 'रिमझिम'समोर त्याचा शर्ट काढतो आणि तिला जवळ ओढतो. जेव्हा समीरला कळतं की, तिचा ब्लाऊज उघडा आहे, तेव्हा तो त्याचा शर्ट रिमझिमवर ठेवतो. या सीनचा शेवट दोघांनी एकमेकांना प्रेमानं मिठी मारून होतो. कॅमेरा 16 वर्षीय यशिका शर्माच्या उघड्या पाठीवर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी एका दृश्यात यशिका आणि हिमांशूचं पात्र बेडवर एकत्र दाखवलं होतं. यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून युजर्सकडून संताप व्यक्त केला जातोय.
रेडिटवर या एपिसोडच्या व्हिडीओ क्लिप्स आणि स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "15 वर्षांच्या मुलीनं असे इंटिमेट सीन शूट करणं कोणत्या जगात ठीक आहे?" यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, एका युजरनं टिकाही केली आहे की, "हे कायदेशीर आहे का?" इतरांनी असा प्रश्न विचारला की, जर असे सीन आवश्यक असतील, तर टीव्ही शोमध्ये प्रौढ कलाकार का दाखवले जात नाहीत? तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "देशात अशा कोणत्याही प्रौढ महिला कलाकार नाहीत का? ज्या या मालिकांमध्ये काम करू शकतील? रोमँटिक मुख्य भूमिकांसाठी अल्पवयीन मुलींना का दाखवलं जातं? हे घृणास्पद आहे."