डाएट थांबताच वजन झपाट्याने का वाढत? जाणून घ्या अत्यंत मोठे कारण..
GH News January 30, 2026 05:14 PM

डाएट हे आजकाल वजन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत ठरली आहे. वजन घटवण्यापासून ते दीर्घायुष्यापर्यंत अनेक फायदे सांगितले जात असले तरी, ही पद्धत थांबवल्यानंतर अनेक जणांचं वजन पुन्हा झपाट्याने वाढताना दिसतं. यामागचं नेमकं कारण काय आहे, त्याचा शरीरावरती कसा दुष्परिणाम होतो त्याचप्रकारे डाएट हे कुठपर्यंत मर्यादित आहे. डाएट हे नेमके काय आहे? हे आपण पाहूया. आपण बघितले असेल की, अनेक लोक आपल्या आजुबाजूला असे आहेत, जे सातत्याने माझा डाएट सुरू असल्याचे सांगताना दिसतात. डाएट म्हणजे शरीराच्या गरजेनुसार आणि आरोग्य लक्षात घेऊन ठराविक नियमांप्रमाणे घेतला जाणारा आहार. डाएटमध्ये आपण काय खावे, किती प्रमाणात खावे आणि कोणत्या वेळी खावे याचा विचार केला जातो.

वजन नियंत्रणात ठेवणे, शरीर निरोगी राखणे, आजारांपासून बचाव करणे आणि ऊर्जा टिकवून ठेवणे यासाठी डाएट महत्त्वाचे असते. योग्य डाएटमध्ये पौष्टिक अन्न, फळे, भाज्या, धान्ये, प्रथिने आणि पुरेसे पाणी यांचा समतोल असतो. म्हणजेच फक्त कमी खाणे नव्हे, तर योग्य आणि संतुलित खाणे म्हणजे डाएट होय.

डाएट थांबताच वजन झपाट्याने का वाढते?

डाएट थांबताच वजन झपाट्याने वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराची सवय अचानक बदलणे. डाएटच्या काळात आपण कमी कॅलरी, ठराविक वेळेत आणि नियंत्रित प्रमाणात अन्न घेतो, त्यामुळे शरीर कमी ऊर्जेत काम करण्याची सवय लावते. पण डाएट सोडताच जर पुन्हा जास्त तेलकट, गोड किंवा जंक फूड खाल्ले, तर शरीर त्या अतिरिक्त कॅलरी लगेच चरबी म्हणून साठवू लागते.

तसेच डाएटमध्ये कमी झालेला मेटाबॉलिझम हळूहळू वाढायला वेळ घेतो, त्यामुळे वजन पटकन वाढते. व्यायाम थांबवणे, पाणी कमी पिणे आणि अनियमित झोप यामुळेही वजन वाढण्यास मदत होते. म्हणून डाएट थांबवतानाही हळूहळू संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली ठेवणे गरजेचे असते.

डाएट थांबताच वजन वाढल्यामुळे होणारे नुकसान

डाएट थांबताच वजन झपाट्याने वाढल्यास त्याचे अनेक प्रकारचे नुकसान शरीरावर आणि मनावर होते. अचानक वाढलेले वजन पोटावर, कंबरेवर आणि मांड्यांवर चरबी साठवते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. वजन वाढल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शरीर जड वाटणे, थकवा लवकर येणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.