हिंदू धर्मात माघ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. या दिवशी गंगास्नान, दान आणि विष्णू पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदा १ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असणार आहे. या दिवशी देव पृथ्वीवर अवतरतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, सुख- समृद्धी टिकून राहते. ( Maagh Purnima 2026 Date And Upay )
माघ पौर्णिमा तिथी
हिंदू पंचांगानुसार, माघ पौर्णिमा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाईल. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३:४५ वाजता पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार असून १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३:२५ वाजता पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजेसाठी १ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५:३० वाजेपासून ते सकाळी ०७:१० पर्यंत अमृत काळ असणार आहे.
पवित्र स्नान आणि अर्घ्य
या दिवशी शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे. जर घरीच स्नान करत असाल, तर पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. तसेच स्नानानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. यामुळे आरोग्य समस्या कमी होतात.
मुख्य दार
घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असे म्हणतात. म्हणून माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावावे. तसेच दारावर हळदीने स्वस्तिक काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते.
लक्ष्मीची पूजा
या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीचा अभिषेक करावा. रात्री लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.
दान
माघ पौर्णिमेला तीळ, गूळ, चादर, तूप किंवा अन्न गरजू व्यक्तीला दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो.
हेही वाचा: Surya Arghya Vidhi: सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत कोणती?
तुळशीची पूजा
या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला ११ प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
चंद्राची उपासना
पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून किमान १०८ वेळा चंद्राच्या मंत्राचा जप केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. ॐ सों सोमाय नमः । हा जप करावा.
( Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही. )