Union Budget 2026 : देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणार, आयातीवरील निर्भरता कमी करणार : निर्मला सीतारमण
गणेश लटके February 01, 2026 02:13 PM

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman)  यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर केला. आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागलं होते. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा  देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. आयातीवरील निर्भरता कमी करणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. 
लोकांची क्रयशक्ती वाढवणार आहोत. 

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही रचनात्मक सुधारणावर भर देणार

या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही रचनात्मक सुधारणावर भर देणार असल्याचे सीतारमण म्हणाल्या.  लोकांची क्रयशक्ती वाढवणार आहोत. तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रावर आमचा भर असणार आहे, यासाठी 40 हजार कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे.  देशांतर्गत उत्पादन क्षमता उभारण्यात आली असून ऊर्जा सुरक्षाही अधिक मजबूत करण्यात आली आहे. सरकारने लोकप्रियतेपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य दिले आहे. केवळ भाषणबाजीऐवजी सरकारने ठोस सुधारणा राबवल्या आहेत. मोदी सरकारने असमंजसपणा बाजूला ठेवत निर्णायक कृतीचा मार्ग स्वीकारला आहे. भारताची विकासयात्रा सातत्यपूर्ण आर्थिक वाढ आणि नियंत्रित महागाईमुळे ओळखली जाते. धोरणात्मक निर्णयांमुळे मजबूत मॅक्रो-आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यात आले आहे.

नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर यायला सुरूवात झाली

आम्ही 12 वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत आलो त्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य नव्हतं, राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात होती. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर यायला सुरूवात झाली. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व्हायला सुरूवात झाली.

अर्थसंकल्पातील महत्वाची घोषणा कोणत्या? 

केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करणार.
भारताला औषध निर्मितीचे हब बनवू, बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देणार
इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स - सेमी कंडक्टरसाठी  40,000 कोटींची तरतूद
सरकार दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर तयार करणार
जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल
सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार
आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधले जातील 
जलमार्गाचे जाळे वाढवणार 2047 पर्यतं 12 टक्क्यांनी वाढवणार
सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार  
भारताला औषध निर्मितीचे हब बनवणार आहे
बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त 
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर
 मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर 
 20 नवे जलमार्ग बनवणार 
बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती

Union Budget 2026 : इन्कम टॅक्सचे काय? बजेटमुळे काय स्वस्त? निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प सविस्तर

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.