अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रोजगार, शिक्षण आणि युवकांसाठी पेटारा उघडला; केंद्रीय अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी, वाचा टॉप 10 मुद्दे!
विशाल देवकर February 01, 2026 02:13 PM

Union Budget 2026 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला म्हणजे आज देशाचा 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) आज संसदेत सादर केलाय. निर्मला सीतारमण यांनी आज नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय. अर्थमंत्री सीतारमण यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर केलाय. दरम्यान, भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि पुढील दोन वर्षांत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे, अशा वेळी सरकारसमोर अनेक मोठे आर्थिक आव्हाने आहेत. दरम्यान देशातील सर्वांच्या नजरा लागलेल्या या  केंद्रीय अर्थसंकल्पा (Union Budget 2026) रोजगार, शिक्षण आणि युवकांसाठी नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्यात हे जाणून घेऊ.

Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार, शिक्षण, युवकांसाठी काय? टॉप 10 मुद्दे

महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याचा फायदा विणकर आणि कुटीर उद्योगांना होईल. गरीब ग्रामीण तरुणांना याचा फायदा होईल. भारताकडे क्रीडा-संबंधित उत्पादने विकसित करण्याची क्षमता आहे. सोबतच देशात तीन मोठ्या केमिकल पार्कची निर्मिती करणार. हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकलेला चालना देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेची घोषणा यावेळी निर्मला सीताराम यांनी केली आहे.

देशात तीन मोठ्या केमिकल पार्कची निर्मिती करणार. मेगा टेक्स्टाईल उभारणी करणार, देशात तीन बायफॉर्मासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लघु उद्योग, विकासाची नवे शहरे आधारित केंद्र स्थाप करत आहोत. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना राबवतोय ज्यातून एक जिल्हा एक उत्पादन आणि ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनींग आणि उद्योग देणार आहोत. खेळासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनावर भर देणार आहोत. बायो फार्मातील संशोधन वाढवण्यासाठी 3 नवीन शैक्षणीक संस्था उभ्या करणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेशीम, ताग आणि लोकरसाठी राष्ट्रीय फायबर योजनेची घोषणा केली.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.