Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) संसदेत सादर केला. आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागलं होते. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना. या योजनेच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन घेण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.
देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे. आयातीवरील निर्भरता कमी करणार असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. लोकांची क्रयशक्ती वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीतारमण यांनी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेची घोषणा केली आहे यामाध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन घेण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनींग आणि उद्योग देण्यात येणार आहेत असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.
केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू करणार.
भारताला औषध निर्मितीचे हब बनवू, बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
पायाभूत सुविधा, एमएसएमई आणि उद्योगांना चालना देणार
इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स - सेमी कंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद
सरकार दुर्मिळ रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर तयार करणार
जागतिक-मानक औषध नियामक स्थापन करेल
सरकार तीन केमिकल पार्क उभे करणार
आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधले जातील
जलमार्गाचे जाळे वाढवणार 2047 पर्यतं 12 टक्क्यांनी वाढवणार
सेमी कंडक्टरसाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार
भारताला औषध निर्मितीचे हब बनवणार आहे
बायोफार्मासाठी 10,000 कोटींची तरतूद
शुगर आणि कॅन्सरचे औषधोपचार स्वस्त
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर
मुंबई- पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर
20 नवे जलमार्ग बनवणार
बॅकिंग क्षेत्राच्या विकासासाठी नवी समिती