नाणीज विद्यामंदिरात गीत गायन स्पर्धा
esakal February 02, 2026 09:45 AM

नाणीज विद्यामंदिरात गीतगायन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २६ : नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि कनिष्ठ विद्यालय येथे देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या.
पाचवी ते सातवी आणि आठवी नववी ह्या दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेत संगीत साथ विद्यार्थी सोहम पांचाळ, रुद्र शेणवी, विघ्नेश कुवळेकर यांनी केली. स्पर्धेचे परीक्षण आशिष सरफरे आणि नियती गावडे यांनी केले. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रांजल भागवत हिने सूत्रसंचालन केले तर कल्याणी सुवारे हिने आभार मानले. या स्पर्धेला मुख्याध्यापिका रूपाली सावंतदेसाई, समाजशास्त्र विषय समितीचे अध्यक्ष उत्तम पवार, ज्येष्ठ शिक्षिका रामा मुळये, सुधाकर माने, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.