बामणोलीतील शाळांना
शैक्षणिक साहित्य भेट
कास, ता. २ ः दुर्गम बामणोली भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना म्हावशी गावातील मुंबई येथील उद्योजक धर्मेंद्र शिंदे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बामणोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, अंधारी, मुनावळे, कोरघळ या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी बामणोली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना धर्मेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना ‘गरुडझेप’ या उदाहरणातून प्रेरणादायी संदेश दिला. संघर्ष केल्यानंतरच यशाचा आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत २२ गावांतील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत बामणोलीचे माजी सरपंच कृष्णा शिंदे, विठ्ठल भोसले, विजय भोसले, तानाजी आगुंडे, रोशन मालुसरे, सीताराम भोसले, विलास गावित, निवृत्ती भोसले, ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक हाेत आहे.
B04506
अंधारी ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना धर्मेंद्र शिंदे. त्यावेळी मान्यवर.
...............................................