टीव्हीएस मोटर कंपनीने जानेवारी २०२६ मध्ये विक्रमी कामगिरी करत देशभरात धुमाकूळ घातला आहे. कंपनीने एकूण ५.१२ लाख युनिट्सची विक्री नोंदवली, जी मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत २९ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) मागणीत ५० टक्क्यांहून अधिक झेप घेतली असून ग्राहक आता विचार न करता सरळ खरेदी करत आहेत.
कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ मध्ये एकूण विक्री ५,११,७६६ युनिट्स इतकी झाली तर जानेवारी २०२५ मध्ये ही आकडेवारी ३,९७,६२३ युनिट्स होती. ही जबरदस्त वाढ मुख्यतः देशांतर्गत दुचाकी विभाग, ईव्हींची वाढती लोकप्रियता आणि निर्यातीतील स्थिर वाढ यामुळे साध्य झाली.
दुचाकी विभागात टीव्हीएसने कमाल दाखवली. एकूण दुचाकी विक्री ४,९४,१९५ युनिट्सवर पोहोचली, जी २८ टक्के वाढ दर्शवते. देशांतर्गत दुचाकी विक्री ३० टक्क्यांनी वाढून ३,८३,२६२ युनिट्स झाली. मोटारसायकल विक्री २६ टक्क्यांनी वाढून २,१९,१८८ युनिट्स तर स्कूटर विक्री ३० टक्क्यांनी वाढून २,२२,९२६ युनिट्स झाली. हे आकडे दाखवतात की शहरी आणि ग्रामीण ग्राहक दोघांमध्ये टीव्हीएसच्या उत्पादनांना जबरदस्त पसंती मिळत आहे.
7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंगइलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात टीव्हीएसने खऱ्या अर्थाने बाजी मारली. ईव्ही विक्री ५० टक्क्यांनी वाढून ३७,७५६ युनिट्स झाली (मागील वर्षी २५,१९५). iQube आणि इतर मॉडेल्सच्या जोरावर कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आघाडीवर आहे. ग्राहक पर्यावरणस्नेही आणि किफायतशीर पर्यायांकडे वळत असल्याने ईव्हींची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेकजण आता पारंपरिक वाहनांऐवजी ईव्ही घेण्यास प्राधान्य देत आहेत.
Airtel Recharge Plan : एअरटेलच्या कोट्यवधी युजर्सना मोठा धक्का! कंपनीने एका रात्रीत बंद केली तुमची पसंतीची फ्री सर्व्हिसनिर्यात व्यवसायही मजबूत राहिला. एकूण निर्यात २१ टक्क्यांनी वाढून १,२२,३४३ युनिट्स झाली, तर दुचाकी निर्यात १८ टक्क्यांनी वाढली. तीन चाकी वाहनांमध्ये तर ७७ टक्के वाढ नोंदवत १७,५७१ युनिट्स विकल्या गेल्या, जे व्यावसायिक आणि ई-रिक्शा सेक्शनमधील वाढती गरज दर्शवते.
Instagram News : इंस्टाग्राम गुपचुप ऐकतंय तुमचं बोलणं? बंद करा 'ही' 1 सेटिंग नाहीतर होईल नुकसान..कंपनीच्या हेडनी स्पष्टच सांगितलंटीव्हीएस मोटर कंपनीसाठी हा महिना सुंदर गोड स्वप्नासारखा ठरला. मजबूत ब्रँड इमेज, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे कंपनीची वाटचाल नव्या उंचींवर पोहोचली आहे. येत्या काळात ईव्ही आणि इतर विभागांतून आणखी मोठे धक्के देण्याची टीव्हीएसची तयारी दिसते. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टीव्हीएसचा डंका आता जोरात वाजतोय