गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेलेल्या तीन अल्पवयीन बहिणींनी रात्री उशिरा त्यांच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी (Ghaziabad Sister death) मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे, तर १५, १४ आणि १२ वर्षांच्या या मुलींच्या वडिलांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, तिघीही एक कोरियन गेम खेळत होत्या (Ghaziabad Sister death), ज्यामध्ये त्यांना ५० दिवसांत पूर्ण करण्यासाठी ५० टास्क देण्यात आले होते. ५० व्या टास्क दरम्यान, तिघांनीही पहाटे २ वाजता त्यांच्या अपार्टमेंटवरून उडी मारून आत्महत्या केली.(Ghaziabad Sister death)
मुलींच्या वडिलांनी रडत माध्यमांना सांगितले, "नंतर आम्हाला त्यांचे फोन पाहिल्यानंतर कळले की, तिघीही कोरियन गेम खेळत होत्या. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले, 'आम्हाला माफ करा, आम्ही कोरियन गेम सोडू शकत नाही. बाबा, आपण कोरियन भाषा सोडू शकत नाही. कोरियन भाषा आपले जीवन आहे. कोरियन भाषा आपल्यासाठी सर्वकाही आहे. तुम्ही आम्हाला त्यापासून वेगळे करू शकत नाही. आपण आपले जीवन सोडून देऊ. मी नुकतीच सुसाईड नोट पाहिली. हे खूप दुःखद आहे,आम्हाला माफ करा, आम्ही निघत आहोत." मुलींच्या वडिलांनी असेही स्पष्ट केले की, त्यांची मधली मुलगी खेळात कमांडर होती. मोठ्या आणि धाकट्या मुलींनी तिच्या सूचनांचे पालन केले. वडिलांनी सांगितले की तिघांनीही मधली मुलगीच्या सांगण्यावरून हे टोकाचे पाऊल उचलले आहे.(Ghaziabad Sister death)
रात्री घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाबाबत मृत मुलींच्या वडिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, रात्री एकदा एक मुलगी येऊन तिच्या आईला किस करून गेली होती. त्यानंतर साधारण रात्री दोनच्या सुमारास तिन्ही बहिणींनी उडी घेत आत्महत्या केली. इतर मुलांप्रमाणेच आमच्या मुली ऑनलाइन गेम खेळतात, एवढीच माहिती आपल्याला होती; मात्र इतका धोकादायक गेम खेळत आहेत आणि त्यात प्राण गमावावे लागतील, याची कल्पनाही नव्हती, असे त्यांनी सांगितले. मुलींच्या मृत्यूनंतरच या गेममध्ये एकूण ५० टास्क असतात आणि शेवटचा टास्क आत्महत्येचा असल्याची माहिती समोर आल्याचे वडिलांनी नमूद केले.
वडिलांनी सांगितले की, फॉरेन्सिक पथकाने मोबाईल तपासणीनंतर गेमिंगमुळे आत्महत्या झाल्याचे स्पष्ट केले. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून मुली हा गेम खेळत होत्या. त्या अनेकदा ‘आम्हाला कोरिया जायचं आहे’ असं म्हणायच्या. मात्र, त्यामागचं कारण आम्हाला कधी समजलं नाही. घटनेच्या रात्री वडील बाहेरील खोलीत झोपले होते, तर आई आतल्या खोलीत होती. पाणी पिण्याच्या बहाण्याने बाहेर येऊन तिन्ही बहिणींनी उडी घेतली. त्या वेळी त्यांच्या हातात मोबाईल फोन होता आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
UP: Minors clearly influenced by Korean culture, says Trans-Hindon DCP on Ghaziabad suicide case
— ANI Digital (@ani_digital) February 4, 2026
Read @ANI Story |https://t.co/dLZ2GxMrO1#Ghaziabad #Suicide #Minors #KoreanCulture pic.twitter.com/GifRPQdXCQ
या घटनेचा उल्लेख करताना वडील भावूक झाले. “कोणता बाप आपल्या मुलांना मरण्याची परवानगी देईल? कोणता बाप अशा गेमला मोकळीक देईल?” असे म्हणत ते रडू लागले. त्यांना या गेममध्ये उडी मारण्याचा टास्क असल्याची कल्पनाच नव्हती, असेही त्यांनी सांगितले. तिन्ही बहिणींमध्ये प्रचंड एकोपा होता आणि त्या नेहमी एकत्रच राहायच्या. त्यांनी शिक्षण सोडले होते आणि एकत्र बसून गेम खेळायच्या. मधली मुलगी स्वतःला ‘बॉस’ समजायची आणि उरलेल्या दोघी तिच्या सूचनांचे पालन करत. तिच्याशिवाय त्या जेवणही करत नसत, अगदी शौचालयातही तिघी एकत्र जात असत. एक मुलगी सातवीत, दुसरी पाचवीत आणि तिसरी चौथीत होती. गेल्या दोन वर्षांपासून त्या शाळेत जात नव्हत्या. नापास झाल्यानंतर लाजेखातर त्यांनी शाळा सोडली होती. खोलीत त्या तिघीच राहत आणि आई वडील त्यांच्या खोलीत गेले की त्या बाहेर निघून जात असत.
सहाय्यक पोलीस आयुक्त (शालीमार गार्डन) अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या तिन्ही बहिणींना कोरियन ऑनलाइन गेम ‘लव गेम’चे व्यसन लागल्याचे समोर आले आहे. मुलींचे पालक त्यांच्या अतिरेकी गेमिंगवर आक्षेप घेत होते. मंगळवारी रात्री साधारण २.१५ वाजता साहिबाबाद परिसरातील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत सिटी येथील एका टॉवरमधील नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून तीन मुलींनी उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली, अशी माहितीही त्यांनी दिली. निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) अशी आत्महत्या केलेल्या मुलींची नावं आहेत.
गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीमध्ये पहाटे 2 वाजताच्या सुमारास, कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही बहिणींचे मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. तिन्ही बहिणींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. ऑनलाइन गेमिंग अॅप्सचे व्यसन असलेल्या तिन्ही बहिणींबद्दल माहिती समोर येत आहे. त्या सतत गेम खेळत होत्या. (Uttar Pradesh Ghaziabad News)
#WATCH | Ghaziabad | DCP Trans-Hindon, Nimish Patil says, "In the early hours of 4th February, we received information that three girls jumped from a building. They were declared dead at the hospital. We have found a suicide note in the case. From the suicide note, it is clear… pic.twitter.com/haImybH3cV
— ANI (@ANI) February 4, 2026