Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. 28 जानेवरी 2026 रोजी सकाळी बातमी आली, अजित पवार यांचं विमान अपघातात निधन… त्यानंतर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, अदितदादा आता आपल्यात नाहीत, हे सत्य मानायलाच तयार नव्हत्या. अजित पवार यांच्या निधानाची बातमी समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसलेला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे, ही बातमी सांगण्यासाठी जेव्हा सुनेत्रा पवार यांना फोन आलेला, तेव्हा त्या मानायलाच तयार नव्हत्या…
विमान अपघाताचा फोन आल्यानंतर, काही मिनिटांनंतर ज्याठिकाणी अपघात झाला, तेथून सुनेत्रा पवार यांनी व्हिडीओ कॉल करण्यात आला. ज्यामध्ये ज्यामध्ये जळत्या विमानाचे अवशेष स्पष्ट दिसत होते. ते दृश्य पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार पूर्णपणे कोलमडल्या… त्यांच्यासाठी ती सकाळ काळी सकाळ ठरली… तेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या आणि घडलेल्या घटनेनंतर त्यांनी तात्काळ बारामती येथे जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांचं विमान अपघातात निधनबुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता, जेव्हा अजित पवारमुंबईहून बारामती येथे येत होते, तेव्हा लँडिंग करताना विमान अनियंत्रित झाला आणि धावपट्टीजवळ असलेल्या शेतात पडला. विमान शेतात कोसळल्यानंतर चार ते पास स्फोट झाले आणि सर्वत्र आगीचे लोट पसरले… या अपघातात महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं… कारण राज्याने कामाचा माणूस गमावला…
विमान अपघातात अजित पवार यांच्यासह, खासगी सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, फ्लाईट अटेंडेंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को – पायलट शांभवी पाठक होत्या. या सर्वांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य अद्यापही मोठ्या धक्क्यातून सावरलेलं नाही.
पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथअजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणातील हलचालींनी वेग घेतला. बुधवारी दादांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले… त्यानंतर शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे.