Marathi Actress: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेकांचे साखरपुडे झाले आहेत. काहींनी लग्न ठरल्याची बातमी देत चाहत्यांचं लक्ष वेधलंय. तर काहींनी प्रेमाची कबुली देत खास पद्धतीने गुडन्यूज दिलीय. नुकतंच आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेतील अरुंधतीच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरेने होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटो शेअर करत लग्न ठरल्याची खुशखबर चाहत्यांना दिली होती. अपूर्वाचा होणार नवरा कोण हेदेखील चाहत्यांनी शोधून काढलं होतं. आता अपूर्वाने आपल्या सासरच्या मंडळींसोबत एक फॅमिली फोटो शेअर केलाय. ती 'शाळा' फेम अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्न करत आहे.
अपूर्वाने अंशुमनच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनही लिहिलंय. "आनंदघन येई घरा..introducing you all गोरेंचा जावई अंशुमन जोशी आणि जोश्यांची सून अपूर्वा गोरे...आम्हाला एकत्रितपणे बांधून ठेवणारे आणि आमच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणारे कुटुंबीय मिळाले हे आमचं भाग्यच आहे. आमचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे" असं म्हणत तिने हा फोटो शेअर केलाय. यात अपूर्व आणि अंशुमन दोघेही सुंदर दिसत आहेत.
View this post on Instagram
'आई कुठे काय करते' या मालिकेनंतर अपूर्व गोरे सध्या 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकात काम करत आहे. या नाटकात तिच्यासोबत मराठीतीळ दिग्गज कलाकार आहेत. या नाटकात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकरही आहेत. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील इशा या पात्रामुळे अपूर्वाला घराघरात ओळख मिळाली.
अपूर्वाचा होणार नवरा अंशुमन जोशीही मनोरंजनसृष्टीतीलच आहे. अंशुमनने 2013 साली आलेल्या शाळा या चित्रपटात काम केलंय. मात्र या सिनेमानंतर तो मराठी मनोरंजनविश्वातून काही काळासाठी सक्रिय नव्हता. त्याने अनेक नाटक सिनेमांमध्ये काम केलंय. एक अभिनेता असण्यासोबत तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे.अंशुमनने मल्याळी सिनेमातही काम केलं आहे.२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या थँकम सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला साऊथ सिनेमा होता. कोकण या युट्यूब सीरिजमध्ये तो दिसला होता.