मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, महाजन म्हणाले पहिली टर्म शेवटची ठरु नये, शिवसेना आमदार सुहास बाबरांना इशारा
एबीपी माझा वेब टीम February 04, 2026 08:43 PM

Girish Mahajan :   जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर (Suhas Babar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एकेरी उल्लेख केला होता. याच मुद्यावरुन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच सुहास बाबर यांच्या भाषेवरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे. 

एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज 

सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचं आहे. त्यांची पहिलीच टर्म आहे. मला आश्चर्य वाटलं ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत असे गिरीश महाजन म्हणाले. पहिलीच वेळ आहे, मीच पक्ष चालवतो सगळे असं बोलत आहेत. त्यांचं विधान चुकीचं आहे. राजकारणाची सुरुवात आहे, वर्षभरापूर्वी निवडून आले आहेत. लहान आहेत नवीन आहेत, राजकारण समजून घ्यावे. शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. तोलून मापून बोललं पाहिजे, नाहीतर शेवटची टर्म ठरु नये असेही महाजन म्हणाले. 

आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच सुहास बाबर यांच्या भाषेवरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये, असा देखील इशारा गिरीश महाजन यांनी सुहास बाबर यांना दिला आहे. सुहास बाबर यांनी तोलून मापून बोललं पाहिजे. त्यांनी काय बोलावं? ते लहान आहेत, नवीन आहेत असे महाजन म्हणाले.

Girish Mahajan: गिरीश महाजन म्हणाले, भाजपला कुबड्यांची गरज नाही; आता शिंदे गटातील नेते संतापले, थेट उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार, नेमकं काय घडलं?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.