IND U19 vs AFG U19 हरारे: आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतानं उपांत्य फेरीच्या लढतीत अफगाणिस्तानला 7 विकेटनं पराभूत केलं. भारतानं हरारे स्पोर्टस क्लब येथील मैदानावर 311 धावांचं आव्हान 41.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 311 धावांचा यशस्वी पाठलाग करणारा भारत हा पहिला संघ ठराल आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना शुक्रवारी होणार आहे.
भारताकडून एरोन जॉर्ज यानं शतकी खेळी केली. वैभव सूर्यवंशी आणि एरोन जॉर्ज या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. वैभव सूर्यंवशी 33 बॉलमध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 68 धावा करुन बाद झाला. दहाव्या ओव्हरमध्ये नूरिस्तानी उमरजई याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तर, एरोन जॉर्ज यानं 115 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावली. तर, आयुष म्हात्रे यानं देखील अर्धशतक केलं.