सांगली : नशेखोर, दारूड्यांचा ठिकठिकाणी ठिय्या असायचा. नागरिक पुरते वैतागले होते. अशाच एका ‘डार्क स्पॉट’वर शेतकऱ्याचा खून झाला. माध्यमांसह नागरिकांनी प्रशासनाचा संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसदादांचे रक्त खवळले. पोलिसांनी काल सायंकाळी सातपासून मध्यरात्रीपर्यंत सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील गल्ली न् गल्ली पालथी घातली.
प्रत्येक ठिकाणी सापडलेल्या दारूड्यांसह नशेखोरांना रस्त्यावर खाक्या दाखवला. हे सारे सांगलीकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले. इतकेच नव्हे, तर रस्त्यावर ऊठाबशा काढण्याची शिक्षा दिली. पोलिसांचा दंडुका चालला, नशेखोरांचे धाबे दणाणले. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह दहा पथकांनी विविध ठिकाणी कारवाई केली.
Sangli Crime : सांगलीत जगायचं असेल तर घाबरूनच रहा! नशेखोरांच्या दहशतीने शहर हादरलंशहरातील उद्याने, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, पडिक इमारतीत नशेखोरांच्या ताब्यात गेल्या होत्या. याठिकाणी रात्रभर नशेखोरांचा धिंगाणा सुरू असायचा. इनाम धामणी येथील ‘डार्क स्पॉट’वर नशेखोरांनी क्रांतिकुमार शेडबाळे यांचा दगडाने ठेचून खून केला.
त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली. शेकडो नागरिकांनी अधीक्षक कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने नशेखोरांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले. पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या नेतृत्वात खास पथके तयार करण्यात आली. त्यात एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्याही पथकाचा समावेश होता.
रात्री 3 वाजता सशस्त्र दरोडा, प्रतिकार करणाऱ्या पितापुत्रावर चोरट्यांनी चाकूने केले वार, सीसीटीव्ही व्हिडीओ समोर....सायंकाळी सात वाजता सारेजण साध्या वेशात हातात काठ्या घेऊन निघाले. विश्रामबागमधील पडिक इमारतींसह नशेखोरांच्या अड्ड्यांवर धाव घेतली. त्याठिकाणी बिनधास्त असणाऱ्या नशेखोरांना रस्त्यावर चोपत आणले. भरवस्तीत नागरिकांसमोर ऊठाबशा काढायला लावल्या, तर पळ काढणाऱ्या नशेखोरांचा पाठलाग करत चोप दिला.
कल्पद्रुम क्रीडांगणावर पोलिसांचा मोर्चा वळला. त्याठिकाणी पोलिसांनी पाठलाग करत अनेक तळीरामांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरभर चर्चा झाली. नशेखोरांचे धाबे दणाणले. पोलिस निरीक्षक संजीव झाडे, अरुण सुगांवकर, सुधीर भालेराव, सतीश कदम, भैरू तळेकर, किरण चौगुले, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, आनंदराव घाडगे यांच्या पथकाने कारवाई केली.
कारवाईवर नजर...शहरातील ‘ओपन बार’वर २३ ठिकाणी कारवाई
गांजा ओढणाऱ्या दोघांवर बडगा
गांजा बाळगणाऱ्यांवर गुन्हा
शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर कारवाई कारवाईत सातत्य हवे
पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक कारवाईत सातत्य गरजेचे आहे. पोलिसांचा हा खाक्या सातत्याने दाखवून दिल्यास नशेखोरांवर चाप लागला. नागरिकांकडून या कारवाईचे तूर्त कौतुक होत आहे. परंतु त्यात सातत्य गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.