सांगली : मिरजेतील म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाखांचा सात किलो गांजा जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सोहेल लालूखान पठाण (वय २०), हुसेन बादशाहा सय्यद (२७, दोघेही कैकाडी गल्ली, हिंदू धर्मशाळेमागे, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
Pune Crime : चंदननगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २५ लाखांचे मेफेड्रोन जप्त; सराईत गुन्हेगार अटकेत!स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी अमली पदार्थांची तस्करी, विक्री, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तैनात केले आहे.
पथक मिरजेत गस्त घालत असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद साथीदारासोबत गांजा विक्री करण्यासाठी म्हैसाळ रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा लावला. सय्यद एकासोबत तेथे आल्यावर पथकाने दोघांना ताब्यात घेतले.
Pune Crime : श्रीरामपूर येथील जप्त मुद्देमालातून अमली पदार्थ चोरीला; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांची माहितीत्यांच्याकडील प्लास्टिक पोत्याची तपासणी केल्यावर त्यात सात किलो तयार गांजा सापडला. ही कारवाई पोलिस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कळेकर, पाटील, महादेव पोवार, अमोल ऐदाळे, अतुल माने, आमसिद्ध खोत, रणजित जाधव, श्रीधर बागडी, सुमित सूर्यवंशी, रोहन घस्ते, सायबरचे अभिजित पाटील, अजय पाटील यांनी केली.