आता आरोग्य क्षेत्रातही होणार AI तंत्रज्ञानाचा उपयोग, खासदार अजित गोपछडे यांच्याकडून राज्यसभेत विधेयक
सोमेश कोलगे February 06, 2026 10:43 PM

नवी दिल्ली :  अलिकडच्या काळात अनेक क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता AI चा उपयोग आरोग्य क्षेत्रात देखील होणार आहे. यासाठी आज राज्यसभेत विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी धोरणदृष्टीच्या अनुरुप, जनतेचे आरोग्यसुरक्षा, ग्राहक संरक्षण तसेच वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरत  सार्वजनिक आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या माध्यमातून तीन  विधेयके सादर करण्यात आली आहेत. यामध्ये आरोग्य क्षेत्रात एआय चा वापर करण्यासंदर्भात महत्वाचे विदेयक मांडण्यात आले आहे. 

वैद्यकीय सुरक्षित व विश्वासार्ह राष्ट्रीय विधेयक

रुग्णांसाठी अत्यावश्यक असणारा ऑक्सिजन वापरत झालेल्या चुकांमुळे अनेक रुग्ण दगावले होते ही बाब लक्षात घेता वैद्यकीय सुरक्षित व विश्वासार्ह राष्ट्रीय विधेयक वैद्यकीय ऑक्सिजनचे सुरक्षित उत्पादन, साठवण, वितरण व वापराशी संबंधित आहे. या विधेयकाद्वारे गुणवत्ता मानके, अनुज्ञापन, तपासणी तसेच सध्याच्या उत्कृष्ट उत्पादन प्रक्रियांचे (जी एम पी ) काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोविड काळात दूषित ऑक्सिजनमुळे उद्भवलेल्या अडचणी , रुग्णांचा मृत्यू या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक रुग्ण सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारे ठरणार आहेत.

डिलिव्हरी कर्मचाऱ्यांसंदर्भात विधेयक

अलीकडच्या काळात ऑनलाइन शॉपिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात खाद्यपदार्थांचे समावेश सर्वाधिक आहे. असे ऑनलाईन खाद्यपदार्थ घरी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय कडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे .अशा डिलिव्हरी  बॉयकडून चोरी , दरोडा , रेकी आणि अत्याचारा सारख्या घटना घडत असल्याने त्यांना कायद्याने लागण लावण्यासाठी विधेयक पारित करण्यात यावे यासाठीही विधेयक सादर करण्यात आले. अशा डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचे  पडताळणी, त्यांची नोंदणी तसेच ग्राहक सुरक्षेची हमी देणाऱ्या तरतुदींशी संबंधित आहे. “वितरण प्लॅटफॉर्म , ऑनलाईन साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पूर्ववृत्ताची पडताळणी विधेयक, 2026” हे डिजिटल अर्थव्यवस्थेत विश्वास, पारदर्शकता आणि सार्वजनिक आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अधिकाधिक दर्जेदार आणि अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आहे. मानवी आरोग्य, निदानात्मक संशोधन व वैद्यकीय शिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक, सुरक्षित व मानवी देखरेखीखाली वापर सुनिश्चित करण्याशी संबंधित आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.