Sakshi Mahajan And Atahrv Karve Wedding: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री साक्षी महाजनने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री आता अभिनेता अथर्व कर्वे सोबत लग्नबंधनात अडकली आहे. 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे आणि सोशल मीडियावर त्यांच्या लग्नफोटो-व्हिडीओज व्हायरल होत आहेत.
साक्षी महाजन ही ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मराठीतील तिच्या तिच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या घरी लग्नाची जोरदार तयारी आणि पारंपरिक विधी सुरू होते. सोशल मीडियावर साक्षीने घाणा आणि बांगड्या भरण्याचे फोटो शेअर केले होते, तसेच तिचा हळदी आणि संगीत सोहळाही मोठ्या आनंदात पार पडला होता.
Elvish Yadav: 'मला माझं प्रेम मिळालं...'; एल्विश यादवने 'या' अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा, खास पोस्ट करुन दिली गुड न्यूजView this post on InstagramA post shared by Sakal Premier (@sakalpremier)
६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांनी एकमेकांसोबत नव्या आयुष्याला सुरूवात केली. साक्षीने पारंपरिक ऑफ व्हाईट नऊवारी साडी परिधान केली होती, ज्यावर साजेसे दागिने आणि अबोली माळा तिच्या लूकला आणखी सुंदर बनवत होते. अथर्व कर्वेही तिच्या साडीला साजेसा कुर्ता आणि धोतर परिधान केलेला दिसला. दोघेही त्यांच्या लूकमध्ये अतिशय आकर्षक दिसत होते.
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात होणार डबल एव्हिक्शन; नियम मोडल्याबद्दल स्पर्धकांना मिळणार शिक्षासोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओज प्रचंड पसंत केले जात आहेत आणि चाहत्यांकडून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या नावावरून ‘#साATh’ या युनिक हॅशटॅगनेही सोशल प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग झालं आहे.