आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्ट्स कल्बमधील स्टेडियममध्ये इंग्लंडसमोर 412 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजासमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने इंग्लंडला 40.2 ओव्हरमध्ये 311 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात 100 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. भारताची अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही सहावी वेळ ठरली.
भारताकडून इंग्लंडचा फायनलमध्ये दुसऱ्यांदा धुव्वा
अंडर 19 टीम इंडियाची इंग्लंड विरुद्ध वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची ही एकूण दुसरी वेळ ठरली आहे. भारताने याआधी 2022 साली 5 फेब्रुवारीला इंग्लंडला पराभूत करत पाचव्यांदा अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली होती.