Rose Day 2026: लाल की गुलाबी? गर्लफ्रेंडला कोणता गुलाब द्यायचा? प्रत्येक रंगात दडलाय प्रेमाचा वेगळा अर्थ!
Tv9 Marathi February 07, 2026 11:45 PM

व्हॅलेंटाइन वीक २०२६ ची सुरुवात ७ फेब्रुवारी पासून होणार आहे. हा आठवडा रोज डे पासून सुरू होतो आणि व्हॅलेंटाइन डे पर्यंत चालतो. हा संपूर्ण आठवडा प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि रोमँटिक क्षण साजरे करण्यासाठी समर्पित असतो. यंदा हा आठवडा ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत चालेल. प्रेम, भावना आणि नात्यांमधील आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. या आठवड्यात रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात आणि शेवटी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे येतो.

रोज डेच्या दिवशी गुलाब देताना त्याचा रंग महत्त्वाचा ठरतो. लाल गुलाब खोल प्रेम आणि आकर्षण दर्शवतो, गुलाबी गुलाब जिव्हाळा व कौतुक व्यक्त करतो, पिवळा गुलाब मैत्रीचे नाते दर्शवतो, तर पांढरा गुलाब शांतता, प्रामाणिकपणा आणि आदराचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे नात्याच्या स्वरूपानुसार योग्य रंगाचा गुलाब निवडल्यास तुमच्या भावना अधिक सुंदरपणे व्यक्त होतात.

व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात रोज डेने होते. या दिवशी गुलाब देऊन भावना व्यक्त केल्या जातात. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा होतो, पण त्याआधी येणारा रोज डे प्रेम, आपुलकी आणि नात्यांमधील जिव्हाळा दाखवण्याची संधी देतो. अनेकदा आपण लाल गुलाबालाच प्राधान्य देतो, मात्र प्रत्येक रंगाच्या गुलाबामागे वेगवेगळा संदेश दडलेला असतो. लाल गुलाब प्रेम आणि आकर्षण दर्शवतो, पिवळा गुलाब मैत्री आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो, तर पांढरा गुलाब शांतता आणि शुद्ध भावना व्यक्त करतो. त्यामुळे रोज डेच्या दिवशी गुलाब निवडताना त्याचा रंग आणि त्यामागचा अर्थ समजून घेतला, तर भावना अधिक प्रभावीपणे पोहोचतात.

रोज डे का साजरा केला जातो?

रोज डेचा कोणताही ठोस धार्मिक किंवा पारंपरिक इतिहास नाही. मात्र हा दिवस प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी ओळखला जातो. असे मानले जाते की प्राचीन काळापासून गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. ग्रीक कथांमध्ये गुलाबाचा संबंध प्रेमदेवीशी जोडलेला आढळतो. त्या काळात लोक आपल्या भावना थेट व्यक्त करू शकत नसत, म्हणून गुलाब देऊन प्रेम, आपुलकी किंवा भावना व्यक्त केल्या जात. काळानुसार ही परंपरा वाढत गेली आणि आज रोज डे प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस बनला आहे.

भारतामध्येही रोज डे लोकप्रिय झाला आहे. इतिहासात असे सांगितले जाते की मुघल बादशहा जहांगीरला लाल गुलाब विशेष प्रिय होते. त्याने आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुलाब पाठवले असल्याचे उल्लेख आढळतात.

गुलाबाच्या रंगानुसार त्याचा अर्थ काय?

लाल गुलाब – प्रेम, रोमँटिक भावना आणि आकर्षणाचे प्रतीक मानला जातो. प्रिय व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब दिला जातो. शब्दांशिवाय “मी तुझ्यावर प्रेम करतो/करते” असे सांगण्याचा हा सुंदर मार्ग आहे.

पांढरा गुलाब – शुद्ध प्रेम, आदर आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. हा गुलाब सन्मान व्यक्त करण्यासाठी किंवा नात्यातील प्रामाणिक भावना दाखवण्यासाठी दिला जातो.

पिवळा गुलाब – पिवळा गुलाब मैत्री, आनंद आणि सकारात्मक भावनांचे प्रतीक मानला जातो. हा गुलाब निखळ मैत्री व्यक्त करण्यासाठी, कोणाला शुभेच्छा देण्यासाठी किंवा नात्यातील आनंद दाखवण्यासाठी दिला जातो. तसेच नव्या सुरुवातीसाठी आणि आपुलकीच्या भावनेसाठी पिवळा गुलाब खास मानला जातो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.