स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
निलेश बुधावले, एबीपी माझा February 08, 2026 05:13 PM

Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न का अद्याप का मिळाला नाही? या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मोहन भागवत यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मी त्या समितीत नाही त्यामुळे मला माहिती नाही परंतु जर तो सन्मान त्यांना मिळाला तर त्या पुरस्काराचं महत्व वाढेल. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सावरकर यांना भारतरत्न मिळावा, अशी सातत्याने मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडूनही सातत्याने याच मुद्यावर भाजपला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक समरसता आणि आरक्षण

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत राज्यघटनेने दिलेले आरक्षण सुरू राहिले पाहिजे. जातीवाद हा ळासकट ला पाहिजे जे शतकानुशतके विषमतेचा बळी ठरले आहेत, त्यांना वर आणण्यासाठी वरच्या स्तरावरील लोकांनी थोडे झुकले पाहिजे आणि त्यांना हात दिला पाहिजे. भारत विरोधी शक्ती कितीही स्वप्ने पाहत असल्या तरी आता भारत तोडणारे स्वतःच तुटून जातील आणि भारत जोडला जाईल. आपण मनात 'अखंड भारताचा' संकल्प मजबूत केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

दरम्यान, अमेरिका भारत करारावर मोदी सरकारवर जोरदार विरोधक टीका करत असताना मोहन भागवत यांच्याकडून मात्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलं आहे. ते म्हणाले की, आपण जे घेणार आहोत ते परीक्षा करून घ्यायला हवं. आपलं नुकसान होणार नाही हे लक्षात घ्यायला हवं. जगभरातून जे ज्ञान येत आहे ते आपल्याला घ्यायलाच हवं. ज्यावेळी करार होतात त्यावेळी काहीतरी द्यावं लागेल त्यावेळी काहीतरी आपल्याला मिळेल. सध्याचं जे देशाचं प्रशासन आहे ते लढणारं आणि ठामपणे उभे राहणारं आहे. त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की आपलं कमीत कमी नुकसान व्हावं 

संघात कोणाची निवड करताना जात पाहिली जात नाही

भागवत म्हणाले की, एससी/एसटी असणे हे 'डिस्कॉलिफिकेशन' नाही किंवा ब्राह्मण असणे हे 'क्वालिफिकेशन' नाही. जो उपलब्ध आहे आणि सर्वोत्तम आहे, त्याला जबाबदारी दिली जाते. शहरांमध्ये वस्त्यांच्या आधारावर आणि ग्रामीण भागात गावांच्या गटांच्या (मंडळ) आधारावर काम चालते, ज्यामुळे सर्व जातींचे लोक संपर्कात येतात. ते म्हणाले की, विरोध करणाऱ्यांच्या मनात जेव्हा हे येते की आम्ही इतका विरोध केला तरी त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा ते आमचे ऐकायला लागतात. 

अर्थव्यवस्था आणि रोजगार 

नवीन तंत्रज्ञान आले तरी त्याचा वापर अशा प्रकारे केला पाहिजे की रोजगाराला धक्का लागणार नाही. भारतासाठी 'मास प्रोडक्शन' ऐवजी 'जनसामान्यांकडून उत्पादन या संकल्पनेवर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.  केवळ नोकरीच्या मागे न धावता शेती आणि इतर कष्टाच्या कामांना समाजात सन्मान मिळाला पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्याला कर्ज घेण्याची गरज पडू नये, तो आपल्या जमिनीचा मालक राहावा, गुलाम नाही. प्रत्येक तहसील स्तरावर साठवणूक आणि मूल्यवर्धनाची व्यवस्था झाली पाहिजे, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.