अजितदादा आणि सुरेश कलमाडींच्या जाण्यानं पुण्यावर दुःखाचा प्रसंग, महापौरांची निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न
मिकी घई, एबीपी माझा February 08, 2026 09:43 PM

Pune : महानगर पालिका निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं आहे. अनेक ठिकाणी एकहाती सत्ता काबीज केली आहे. दरम्यान, आता कोणत्या महानगरपालिकेत कोण महापौर होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आज पुण्यात महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. महापौरांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. अजितदादांच्या आणि सुरेश कलमाडींच्या जाण्यानं शहरावर दुःखाचा प्रसंग आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने श्रद्धांजली म्हणून महापौर निवड लवकर करावी, असे मत भाजपचे पुणे महानगपालिकेचे गटनेते गणेश बिडकर यांनी व्यक्त केले.

पुण्याच्या महापौरांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु 

पुण्याच्या महापौरांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने श्रद्धांजली म्हणून महापौर निवड लवकर करावी, असे मत गणेश बीडकर यांनी व्यक्त केले. कुठलाही जल्लोष ढोल ताशा गुलाल उधळला जाणार नाही. पुण्यात राजकारण फक्त राजकारणाच्या वेळीच होते असे बीडकर म्हणाले. इतर प्रसंगांमध्ये सर्व पक्ष एकत्र येतात ही पुण्याची संस्कृती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला आवाहन आहे की निवडणूक लवकर संपवावी. महापौर- उपमहापौर निवडीनंतर कोणताही जल्लोष केला जाणार नाही. महापौर- उपमहापौरांचा एक ओळीचा अभिनंदनाचा ठराव होणार असल्याचे बीडकर म्हणाले. इतर पक्षांशी चर्चा झाली आहे ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील असेही बीडकर म्हणाले. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. 

महापालिकेचे सभागृह पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी गजबजणार

महापालिकेतील प्रशासकराज संपुष्टात येऊन सुमारे चार वर्षांनी महापालिकेचे सभागृह पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी गजबजणार आहे. उद्या (सोमवारी) 9 फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली असून महापालिकेचे सभागृह अस्तित्वात येणार आहे. महापालिकेत महापौर उपमहापौर यांच्या निवडीनंतर पुढील काही दिवसातच स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते तसेच विविध समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. या समित्यांच्या सदस्यांमधून अध्यक्षांची निवड होणार आहे. महापालिकेच्या सभागृहात नवीन पदाधिकारी येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे पवारांसोबत अन् उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार, 2029 च्या लोकसभा निवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचं महत्त्वाचं भाकीत

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.