रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी पश्चिम बंगाल सरकारला विनंती केली की, राज्यात रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार जमीन आणि परवानग्या देऊन केंद्राला सहकार्य करावे.
Pappu Yadav News: पप्पू यादव यांना पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून बेऊर तुरुंगात आणण्यात आले१९९५ सालच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून बेऊर तुरुंगात आणण्यात आले.
TMC MP Abhishek Banerjee: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी कोलकाता विमानतळावर दाखलअकोल्यातील बाळापूर शहरात लग्नाच्या वरातीत तलवारबाजी खेळली जात होती. त्यामुळे एका लहान मुलाच्या डोक्याला तलवार लागल्याने जखम लागली आणि पाच टाके पडले.
Dhule Live : मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ मिक्सर कंटेनर जळून खाकधुळे जिल्ह्यातून जाणार्या मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्याजवळ आज रविवारी दुपारी वंडर सिमेंट कंपनीतून निघालेला मिक्सर कंटेनरने अचानक पेट घेतला. अवघ्या तासभरात जळून खाक झाला. कंटेनरला लागलेली आग फायर ब्रिगेड च्या मदतीने विझवण्यात आली. तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
Nashik Live : नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची बंपर आवक, 35 लाख क्विंटल ची अवके मुळे शेतकऱ्यांचे 269.50 कोटीचा फटकानाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 35 लाख क्विंटल लाल कांद्याची बंपर आवक झाली... मात्र वाढत्या पुरवठ्यामुळे बाजारभाव अक्षरशः कोसळले आहेत... अवघ्या महिनाभरात दरात मोठी घसरण होऊन शेतकऱ्यांना तब्बल 269 कोटी 50 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा अंदाज आहे.
Uttarpradesh Live : जय पवार यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचं प्रयागराज येथे विसर्जनउत्तरप्रदेशातील पावन प्रयागराज येथे गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
Cricket Live Updates: टी२० वर्ल्ड कपमधील भारत वि. पाकिस्तान सामना होण्याची शक्यता, आज महत्त्वाची बैठकपपाकिस्तान सरकारने काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध टी२० वर्ल्ड कपमधील सामना खेळू नये असं त्यांच्या संघाला सांगितले होते. पण आता हा सामना होण्याची शक्यता आहे. आज पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्या महत्त्वाची बैठक होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोत आयोजित करण्यात आला आहे.
Mumbai Live Update : विश्वविजेत्या युवा भारतीय संघाचे मुंबईत आगमन६ फेब्रुवारी रोजी हरारमध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप भारतीय संघाने आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात जिंकला होता. या विश्वविजयानंतर भारताचा युवा संघ मुंबईत दाखल झाला आहे.
पंढरपुरात पालखी मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असताना मुरूम वाहतूक करणाऱ्या एका टिपरला आज दुपारी अचानक आग लागली. इसबावी परिसरात ही घटना घडली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर उडी घेतली आणि आपला जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली.
Solapur Live : मोहोळमधील धाब्यावर आढळलेल्या EVM प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून खुलाशाची मागणीसोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एका धाब्यावर EVM मशीन आढळून आल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने संबंधितांकडून खुलासा मागितला आहे. या प्रकरणात क्षेत्रीय अधिकारी तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित EVM मशीन राखीव (रिझर्व्ह) असल्याने त्यावर कोणतेही मतदान झालेले नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक प्रभारी संतोषकुमार देशमुख यांनी केले आहे.
याचबरोबर अकलूज येथे लहान मुलाला मतदान केंद्रात नेल्याच्या प्रकरणातही कारवाई होणार असून, मोहिते पाटील यांच्यासह संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रभारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली आहे.
मोहोळमध्ये धाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याचा प्रकार दुर्दैवी आणि अत्यंत गंभीर असून याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मतदान प्रक्रियेत आपल्या मुलाला ईव्हीएमचे बटन दाबायला लावणे चुकीचे असून त्या मतदारासह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधातही आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच ईव्हीएमखाली जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्तरप्रदेश येथे बीटा-२ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अच्छेर परिसरात कथित धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून तातडीने कारवाई करत स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. तपासात असे दिसून आले की, सुरेश नावाचा टॅक्सी चालक त्याची पत्नी आणि मेहुणी आणि अच्छेर येथील रहिवासी चंद्रकरण नावाच्या व्यक्तीसह काही महिलांना एकत्र करून त्यांना ख्रिश्चन धर्माबद्दल माहिती देत होता. दोन्ही पुरुषांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.
Mumbai Fire: वाशीतील एपीएमसी मार्केट परिसरात एका ट्रकला अचानक आगवाशीतील एपीएमसी मार्केट (Vashi APMC Market) परिसरातील टर्मिनलमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिक तपास सुरू आहेत.
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या येवला दौऱ्यावरराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकच्या येवला दौऱ्यावर येत असून त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. वडगाव येथील कापसे फाउंडेशन या ठिकाणी प्रधानमंत्री कौशल्य योजना सेंटरचे उद्घाटन सह अनुलोम या संस्थेचा कार्यक्रम होणार असून, आयोजकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कापसे फाउंडेशनच्या मूकबधिर मुलांनी आकर्षक फुलांची सजावट करून फडणवीस यांच्या एकत्रित कुटुंबाची सुंदर रांगोळी काढली असून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे
Mumbai Pune Expressway: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलमध्ये टोल नाक्यावर गोंधळजुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलमध्ये टोल नाक्यावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra live : महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे- अभिनेते सयाजी शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त करत दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी अस ते म्हणाले आहेत.
Latur live : लातूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यशलातूरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागाला यश आलं आहे.
Sindhudurg Live : भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्जलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा उद्या, ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देवीच्या मंदिराभोवती आकर्षक सभा मंडप उभारण्यात आला असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नऊ रांगाद्वारे दर्शन देण्यात येईल. उद्या देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेते व मुंबई नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आंगणेवाडी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Baramati Live : बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यताबारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जातील. अंतिम मतदारयादी १० मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल.
Ratnagiri Live : रत्नागिरीत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा साजरारत्नागिरीत देखील गजानन महाराज प्रकटदिन सोहळा साजरा करण्यात आला. खेड तालुक्यामधील कशेडी येथे श्री गजानन महाराज मंदरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. १४८ व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विधीवत अभिषेक आणि होमहवन असे विविध कार्यक्रमांनी मंदिरातील वातावरण भक्तीमय झालय.
Pune Live : पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाच काम अंतिम टप्प्यातपुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाच काम अंतिम टप्प्यात आले असून तब्बल चार वर्षानंतर पुण्याचे महापौर बंगल्यात वास्तव्यास येणार..त्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे.
Shivaraj Singh Chauhan Live : सर्वच अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात विक्रीची सूट मिळालेली नाही-कृषीमंत्री शिवराजसिंह चौहानकेंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले की, अमेरिकेतील सर्वच कृषी उत्पादनांना भारतात सवलत देण्यात आलेली नाही. "सोयाबीन, मका, तांदूळ, गहू, साखर, धान्य, कुक्कुटपालन उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, केळी, स्ट्रॉबेरी, चेरी, आंबट फळे, हिरवे वाटाणे, काबुली चणा, मूग, तेलबिया, इथेनॉल आणि तंबाखू यांसारख्या उत्पादनांना कोणताही शुल्क सवलत मिळालेली नाही. तर आपल्या प्रमुख पिके, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळालेला नाही. त्याचप्रमाणे, द्रव पदार्थ, पावडर, क्रीम, दही, ताक, लोणी, तूप, बटर ऑइल, पनीर आणि चीज यांची भारतात आयात केली जाणार नाही. आमचे मसाले संरक्षित आहेत. अनेक भारतीय कृषी उत्पादनांना अमेरिकेत शून्य-शुल्काचा प्रवेश मिळेल, तरीही अमेरिकन कृषी वस्तूंना भारतात अशीच सूट मिळालेली नाही."
संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. संघाने सलमान खानला बोलावालं याचं स्वागत आहे पण संघाच्या शाखांत मुस्लिमांना प्रवेश आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगावं असं ते म्हणाले आहेत.
कोल्हापुरात तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, काठ्या–तलवारींचा वापर; परिसरात भीतीचे वातावरणकोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत काठ्या आणि तलवारींचा वापर झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले असून शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हाती...BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हाती...
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
तावडे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हातात असणार आहेत.
त्यामुळे समस्त विल्ये ग्रामस्थ व राजापूरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब असणार आहे.
महापौरपदी त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर गावातील मंडळींकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला.
नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणारLatest Marathi Live Updates 13 january 2026 : नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार, राज्यातील हे पहिलेच केंद्र आहे निदान, उपचारा सोबत तिथे संशोधन सुद्धा केलं जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात सिकलसेलचे दीड हजार रुग्ण आहेत विदर्भ आणि मध्य भारताच्या सीमेवरून सिकलसेल रुग्णांच्या वेदनांना आता विज्ञानाची आणि मायेची फुंकर मिळणार आहे. नागपूर मेडिकल मध्ये सिकलसेल वेलनेस हबच्या रूपाने एक नवे वरदान उभे राहिले आहे. या केंद्रातून सोमवारपासून सिकलसेलग्रस्तांना एका छताखाली निदान आणि उपचारासोबत संशोधनही होणार आहे...यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..