प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं, 6 मिनिटांत 4 लिटर पाणी प्यायली, नायिकेनं सांगितला 'तो' किस्सा
भाग्यश्री कांबळे February 08, 2026 09:43 PM

Sudha Chandran Reacts To Controversy Over Viral Devotional Video: जानेवारीच्या सुरूवातीला ज्येष्ठ टीव्ही अभिनेत्री सुधा चंद्रन यांचं नाव प्रचंड चर्चेत आलं होतं. चर्चेत येण्यामागचं कारण होतं व्हायरल व्हिडिओ. त्यांच्या घरी आयोजित केलेल्या माता की चौकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल झाला होता.   व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या अंगात आल्याचं दिसून येत आहे. सुधा अचानक भजन सुरू असताना नाचताना दिसत आहेत.  भक्तीमध्ये त्या भान हरपून गेल्या. हा व्हिडिओ समोर येताच चर्चेचा विषय बनला.  अनेकांनी या व्हिडिओवर श्रद्धा आणि भक्तीचे खरे दर्शन घडवले असल्याचे म्हटले.  तर, काहींनी या व्हिडिओला ट्रोल केलं आहे.  अभिनेत्रीवर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या वादाच्या पार्श्वभूमीवर, सुधा चंद्रन यांनी या भावनिक क्षणाबद्दल उघडपणे भाष्य केले आहे.

व्हायरल व्हिडिओवर सुधा चंद्रनची प्रतिक्रिया

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

अभिनेत्री सुधा चंद्रनने मुलाखतीत या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, "त्या दिवशी माझ्यासोबत नेमकं काय घडलं?  ते मला आजही आठवत नाही.  मी असे म्हणणार नाही की, देवीने स्वत: माझ्यात प्रवेश केला.  कारण असं झालं तर, माझ्या शरीरात मोठं काहीतरी घडेल.  कारण माझं शरीर कोणतीही उर्जा सहन  करू शकत नाही", असं अभिनेत्री म्हणाली.

"मला असं वाटतं की त्यांच्यातील काही भाग माझ्यात आशिर्वाद म्हणूनही आला असेल, एवढंच मी म्हणू शकते.  कदाचित असेल किंवा नसेलही.. मी सध्या निश्चितपणे सध्या काहीही सांगू शकत नाही. पण मला माहित आहे, माझ्यावर आशिर्वाद आहे. मी नेहमीच या गोष्टींवर विश्वास ठेवला आहे. माझ्यासोबत या गोष्टी घडल्या आहेत", असंही सुधा चंद्रन यांनी पोस्टमध्ये म्हटलं.

"यावेळी माझ्या शरीरात उर्जा जास्त होती. त्यानंतर मला खूप थकवा जाणवला. माझ्या कुंटुंबाने मला सांगितले की,   त्यानंतर मी सुमारे 6-7 मिनिटांत 4 लिटर पाणी प्यायले होते.  माझ्या पतीने मला सांगितले की, मी सतत पाणी मागत होती, पाण्यासाठी भीक मागत होती", असं अभिनेत्री सुधा चंद्रन म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कॅन्सरशी झुंज अपयशी; प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.