Prakash Mahajan on Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संघटना सोडून ज्योतिषी धंदा सुरु केला का? असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी हाके यांच्यावर टीका केली. 2026 सुरु आहे. 2029 मध्ये काय होणार? हे जर त्यांना समजतं असेल तर स्वतःचं काय होणार हे पण त्यांनी सांगावं असे महाजन म्हणाले. ज्याला स्वतःचे माहिती नाही अशी लोकं पक्षांचे भविष्य सांगतायेत. लक्ष्मण हाके यांची मनस्थिती ठिक आहे ना? असा टोला देखील महाजन यांनी लगावला.
महाराष्ट्राच्या राजकारणात 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल पाहायला मिळू शकतात. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याची शक्यता असून, सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत युती करू शकतात, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते आज सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. लक्ष्मण हाके यांच्या मते, 2029 मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी हे तीन पक्ष एका आघाडीत असतील.
मोहोळमधील ईव्हीएम प्रकरणावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा गलथान कारभार केला त्यांची चौकशी झाली पाहिजे. जरी राखीव EVM असले तरी त्यांचा दुरुपयोग होऊ शकतो असेही महाजन म्हणाले. त्यांची कॉपी होऊ शकेल, त्याची टेकनॉलॉजि जाऊ शकते. त्यामुळं ज्यांनी निष्काळजीपना केला त्यांच्यावर करावाई झाली पाहिजे, त्याला निलंबित केलं पाहिजे असे महाजन म्हणाले.
मोहोळचे राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना महाजन म्हणाले की, एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतलीच पाहिजे. काही लोकांना स्वतः विषयीचे गैरसमज दूर होतील. बॅलेट पेपरवर जरी निवडणूक झाली तरी ज्यांचं संघटन मजबूत आहे त्यांना फरक पडणार नाही असे महाजन म्हणाले.
भागवत यांनी जे विधान केलं त्यामुळे सरकारला सावकारांना भारतरत्न देणे आता भागच पडणार आहे. काही व्यक्ती अशी असतात ज्यांच्यामुळे पुरस्काराचा मान वाढतो. त्या उदशानेच मोहन भागवत यांनी हे विधान केलं असेल असे महाजन म्हणाले. आम्ही शाखेवर जाताना शेजारी कोण आहे त्याची जात कधी विचारली नाही. भिकू इदाते जे महाराष्ट्चे संघचालक होते ते कोण होते? राज्जु भैय्या सरसंघचालक होते ते कोण होते? जात बघून नाही तर काम आणि हिंदू धर्मावरील निष्ठा बघून सरसंघचालक ठरवलं जातं. असच कोणत्याही रस्त्यावरचा माणसाला सरसंघचालक नाही केलं जातं. 25-50 वर्ष स्वयंसेवक म्हणून कामं करणार्यांना पण कधी सरसंघचालक होता आलं नाही. पण ते कधी तक्रार करतं नाही पण काही लोकं असतात जे उगाच याला का करतं नाही त्याला का करतं नाही विचारतात असे महाजन म्हणाले.
तू कधी शाखेवर गेला का? शाखेवर जा आणि मग प्रतिक्रिया दे. त्यागावर ही संघटना उभारली आहे, त्याग करा मग बोला अस महाजन म्हणाले.