खराडी : खराडी आयटी पार्क येथे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. पार्किंगची पुरेशी सोय नसल्याने रस्ता किंवा पदपथावर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होतो.
परिसरात काही खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांकडे हॉटेलचे परवाने व पार्किंगची सोय उपलब्ध नाही. तर काहींनी हॉटेलसमोरील जागेत पान टपरी, भेळ किंवा इतर खाद्य पदार्थांची दुकाने भाड्याने दिली आहेत. येथे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर पार्किंग करतात.
Pune Traffic News : आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ अपघात; वाहतूक कोंडीमुळे एक मार्गिका बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहनया परिसरात महापालिकेच्या जागा आहेत त्या जागेवर पार्किंगसाठी चार ठिकाणी वाहनतळ उभारल्यास रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल. वाहतूक पोलिस शाखेने येथील सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या पार्किंग व्यवस्थेची पाहणी करून रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत स्थानिक नागरिक विनोद आमले म्हणाले की, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे. यासाठी इमारतीसोबतच पार्किंगची व्यवस्था असणे अपेक्षित आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास महापालिका दंड किंवा इतर कारवाई करू शकते. जर व्यावसायिकाकडून रस्त्यावर पार्किंग केले जात असेल, तर स्थानिक वाहतूक पोलिसांनी कारवाई करतात. मात्र नागरिकांनी तक्रार देऊनसुद्धा कारवाईकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
Kolhapur City : अंबाबाई मंदिर परिसरात वाहतूक कोंडीचा कहर; महापालिका-वाहतूक शाखेचे अपयश उघडखराडी परिसरातील वाहतूक विभाग रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करत असतो. तरीही परिसरातील बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांवर कर्मचाऱ्यांना सांगून कारवाई करण्यास सांगतो.
- संदीप जोरे,
प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक, खराडी वाहतूक शाखा.
येत्या काही दिवसात खराडीत मेट्रोबाबतचा सर्व्हे करणार आहोत. त्यात मेट्रो स्थानकाजवळ वाहनतळ करण्याचे प्रयोजन आहे.
- दिनकर गोजरे, मुख्य अभियंता विशेष प्रकल्प विभाग.