'आप सठिया गये है क्या?' प्रार्थना बेहेरने बिग बींना विचारलेला अजब प्रश्न, मिळाली थेट नोकरी
esakal February 09, 2026 03:45 AM

Prarthana Behere’s Fearless Question To Amitabh Bachchan That Changed Her Life: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेही मालिका सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने तिच्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. प्रार्थना सुरुवातीला पत्रकार होती. ती मनोरंजन बीट सांभाळत होती. तिचं शिक्षण देखील मास कम्युनिकेशनमध्ये झालं होतं. तिने पत्रकारितेच्या काळात अनेक सेलिब्रिटींना वादग्रस्त प्रश्न विचारले होते. दरम्यान अशातच तिने पत्रकारितेच्या वेळीचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा किस्सा शेअर केलाय.

नुकतीच प्रार्थना बेहेरेने आरपार या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिने पत्रकारितेचा किस्सा शेअर केला. यावेळी बोलताना तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आलेला अनुभव देखील शेअर केला. ती म्हणाली, 'नि:शब्द सिनेमाची पत्रकार परिषद होती. त्यावेळी मी तिथे गेले होते. त्या सिनेमात एक ६० वर्षांचा माणूस १६ वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडतो.'

'मी जशी कॉलेजमध्ये बिनधास्त होते. तशीच त्यावेळी सुद्धा होते. जेव्हा पत्रकारांना प्रश्न विचारण्याची वेळ आली, तेव्हा मी हात वर केला. मी अमिताभजींना प्रश्न केला की, लोक बोलते है की आदमी ६० साल मे सठिया जाता है. इस फिल्म मै आपने भी सठिया जाने की वजह से १६ साल की लडकी से प्यार किया?' हे मी त्या सिनेमाबद्दल विचारत होते. त्यावर त्यांनी उत्तर देत 'ते तुम्हाला सिनेमा पाहून कळेल' असं म्हटलं.'

View this post on Instagram

A post shared by Prarthana Behere Jawkar (@prarthana.behere)