Astrology Prediction marathi : फेब्रुवारीच्या या नव्या आठवड्याची सुरुवात ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे अत्यंत शुभ होत आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार उद्यापासून (९ फेब्रुवारी २०२६) विशेषत: ६ राशींच्या नशिबात मोठे बदल घडणार आहेत. यावेळी धनयोग प्रबळ असल्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील.
१. मेष (Aries Horoscope)मेष राशीच्या लोकांना शनिचे मेष राशीतील आगमन येत्या काळात नवी खुशखबर देणार आहे. उद्यापासून अचानक धनलाभाचे योग आहेत.
जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही इच्छा आता पूर्ण होऊ शकते.
नोकरीत बढती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
२ ,वृषभ (Taurus Horoscope)जुन्या गुंतवणुकीतून म्हणजेच Shares किंवा Mutual Funds आता चांगला परतावा मिळण्यास सुरुवात होईल.
अडकलेले पैसे किंवा कोणाला दिलेले उसने पैसे अनपेक्षितपणे परत मिळतील.
व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन करार करण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल.
Horoscope : फेब्रुवारीत सूर्य-राहू युती! बनतोय ग्रहण योग; ४ राशींची अग्निपरीक्षा, वेळीच सावध व्हावे, नाहीतर येऊ शकतात मोठ्या अडचणी ३. सिंह (Leo Horoscope)तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.
उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे.
घरातील कोणाचे तरी लग्न ठरण्याची किंवा मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.
४. तूळ (Libra Horoscope)समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील.
पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
परदेश प्रवासाची किंवा नवीन वास्तू घेण्याची इच्छा या आठवड्यात पूर्ण होईल.
"सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर” हिंदवी स्वराज्याचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांचे वंशज आता कुठे आहेत? सध्या त्यांची परिस्थिती कशीये? ५. धनु (Sagittarius Horoscope)लॉटरी, वारसाहक्क किंवा अनपेक्षित मार्गाने पैसे मिळण्याचे योग आहेत.
आर्थिक आवक वाढल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणे सोपे होईल.
दीर्घकाळ चालत असलेल्या आजारातून सुटका होईल ज्यामुळे मनावरचा ताण कमी होईल.
६. कुंभ (Aquarius Horoscope)तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल.. ज्यामुळे तुम्ही अवघड कामे सहज पूर्ण कराल.
नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, ज्यामध्ये पॅकेज चांगले असेल.
जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील आणि त्यांच्या मदतीने मोठे आर्थिक काम मार्गी लागेल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.