Dharashiv Zilla Parishad election results 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल हाती आले आहे. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेर जिल्हा परिषद गटातल लढतीकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. कारण या गटातून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर या निवडणूक लढवत होत्या. यामध्ये अर्चना पाटील या विजयी झाल्या आहेत. पराभव झाल्यानंतर सक्षणा सलगर यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष दिल्याचे सलगर म्हणाल्या.
तेर जिल्हा परिषद गटातून पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भावजयीला निवडणूक आणण्याचा प्लॅन सक्सेस केला असे सक्षणा सलगर म्हणाल्या. ओमराजे यांनी अर्चना पाटील यांना निवडूण आणण्यासाठी प्लॅनिंग केली होती. निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे सलगर म्हणाल्या. सक्षणा सलगर यांनी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांचे आभार मानत टिका केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी करोडो रुपायचं वाटप केले होते असे सलगर म्हणाल्या. तेर गटातुन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील 2328 मतांनी विजयी झाल्या आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकरांनी गावकीपेक्षा भावकीवर लक्ष देत त्यांच्या भावजयी अर्चना पाटील यांना निवडून आणलं. तेर मधील पराभूत उमेदवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत. तर करोडो रुपयांच वाटप अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं रात्रीचे सीसीटीव्ही तपासा असे सक्षणा सलगर म्हणाल्या. सक्षणा सलगर यांनी अर्चना पाटील यांच्या विरोधात तेरमधून निवडणूक लढवली होती.
माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत 2187 मतांनी विजयी झाले आहेत. परंडा तालुक्यातील जवळा गटातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे विजयी झाले आहेत. धनंजय सावंत यांनी बंड करून लढवल्या भूम परंडा वाशी मतदार संघात जागा लढवल्या होत्या. भूम परंडा वाशी हा आमदार तानाजी सावंत यांचा मतदारसंघ आहे. धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये धनंजय सावंत यांची लढत होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.