राणेंना भराडी देवी पावली! सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाचे किती
Marathi February 10, 2026 12:25 AM

सिंधुदुर्ग झेडपी निवडणूक निकाल 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (Sindhudurg ZP Election Result 2026) व पंचायत समिती निवडणुकीत (Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026) भाजपने (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेत तब्बल 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून, तळकोकणात ‘राणे ब्रँड’ची हवा पुन्हा एकदा कायम असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

आज सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकीकडे आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात सुरू असतानाच, दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा निवडणूक निकाल जाहीर झाला. या दुर्मीळ योगायोगामुळे “राणेंना भराडी देवी पावली” अशी भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.

Sindhudurg ZP Election Result 2026: भाजपचा करिश्मा; जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता

50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 14 जागांवर समाधान मानावे लागले, तर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना केवळ 3 जागांवर अडकली आहे. 6 अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवत काही ठिकाणी चुरशीचे राजकारण दाखवून दिले.

सिंधुदुर्ग झेडपी निवडणूक निकाल 2026: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पक्षनिहाय बलाबल

एकूण जागा : 50

भाजप : 27

शिवसेना (शिंदे गट) : 14

शिवसेना (उबाठा) : 3

अपक्ष : 6

Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026: पंचायत समित्यांवरही भाजपची धडक

१०० जागांच्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपने 60 जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदे गटाची शिवसेना 27 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ठाकरे गट केवळ 7 जागांवर समाधान मानताना दिसतो. विशेष म्हणजे, वैभववाडी पंचायत समितीत भाजपने सर्वच्या सर्व 6 जागा जिंकत ‘क्लीन स्वीप’ केला आहे.

Sindhudurg Panchayat Samiti Result 2026: पंचायत समिती – तालुकानिहाय व पक्षनिहाय बलाबल

दोडामार्ग (एकूण 6)
भाजप – 3
शिवसेना (शिंदे) – 3
ठाकरे सेना – ०
अपक्ष – 0

कुडाळ (एकूण 18)
भाजप – 7
शिवसेना – 6
ठाकरे सेना – ५
अपक्ष – 0

वैभववाडी (एकूण 6)
भाजप – 6
शिवसेना – 0
ठाकरे सेना – ०
अपक्ष – 0

देवगड (एकूण 14)
भाजप – 12
शिवसेना – 1
ठाकरे सेना – १
अपक्ष – 0

कणकवली (एकूण 16)
भाजप – 15
शिवसेना – 1
ठाकरे सेना – ०
अपक्ष – 0

मालवण (एकूण 12)
भाजप – 6
शिवसेना – 6
ठाकरे सेना – ०
अपक्ष – 0

सावंतवाडी (एकूण 18)
भाजप – 6
शिवसेना – 6
ठाकरे सेना – १
अपक्ष – 5

वेंगुर्ले (एकुन १०)
भाजप – 5
शिवसेना – 4
ठाकरे सेना – ०
अपक्ष – 1

एकूण पंचायत समिती – पक्षनिहाय अंतिम आकडेवारी

एकूण जागा : 100
भाजप – 60
शिवसेना – 27
ठाकरे सेना (उभा) – ७
अपक्ष – 6

Sindhudurg ZP Election 2026: जिल्हा परिषद विजयी उमेदवारांची यादी

खारेपाटण जिल्हा परिषद : प्राची इस्वालकर (भाजप) (बिनविरोध)

बांदा जिल्हा परिषद : प्रमोद कामत (भाजप) (बिनविरोध)

जाणवली जिल्हा परिषद : रुहिता तांबे (शिंदे शिवसेना) (बिनविरोध)

पडेल जिल्हा परिषद : सुयोगी घाडी (भाजप) (बिनविरोध)

बापर्डे जिल्हा परिषद : अवनी तेली (भाजप) (बिनविरोध)

पोंगुर्ले जिल्हा परिषद : अनुराधा नारकर (भाजप) (बिनविरोध)

किंजवडे जिल्हा परिषद : सावी लोके (भाजप) (बिनविरोध)

कोळपे जिल्हा परिषद : प्रमोद रावराणे (भाजप) (बिनविरोध)

उरण नवघर मतदार संघ : प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)

मालवण जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघ : सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)

सावंतवाडी आंबोली जिल्हा परिषद : शोभा गावडे (भाजप)

कोलगाव जिल्हा परिषद : मायकल डिझोजा (भाजपचे बंडखोर उमेदवार)

तळवडे जिल्हा परिषद : संदीप गावडे (भाजप)

कोकिसरे जिल्हा परिषद : श्रावणी रावराणे (भाजप)

लोरे जिल्हा परिषद : रिध्दी सुतार (भाजप)

आडेली जिल्हा परिषद : विजय नाईक (शिवसेना ठाकरे गट)

नेरूर जिल्हा परिषद : रूपेश पावसकर (भाजपचे बंडखोर उमेदवार)

पावशी जिल्हा परिषद : दादा साईल (शिवसेना शिंदे गट)

फोंडा जिल्हा परिषद : राजन चिके (भाजप बंडखोर उमेदवार)

तुळस जिल्हा परिषद : सुजाता पडवळ (भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार)

पुरळ जिल्हा परिषद : संजय बोबडी (भाजप)

शिरगाव जिल्हा परिषद : देवदत्त दामोदर कदम (भाजप)

माडखोल जिल्हा परिषद : शिवानी नाईक (अपक्ष)

Sindhudurg Panchayat Samiti Election Result 2026: पंचायत समिती विजयी उमेदवारांची यादी

कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)

नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)

जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)

बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)

हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)

नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)

देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)

नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)

बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)

फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)

शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)

कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)

वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)

वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

असिली पंचायत समिती मुद्री (भाजप)

मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)

सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)

दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार

कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

पंचायत समितीतील इतर विजयी उमेदवार

राजेश जाधव – भाजप

कणकवली खारेपाटण पंचायत समिती :  गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)

सावंतवाडी माडखोल पंचायत समिती : प्रथमेश सावंत (अपक्ष)

शिरवंडे पंचायत समिती : दीपक चव्हाण (शिवसेना)

पंचायत समिती सावंतवाडी विलवडे पंचायत समिती: प्रशांत सुकी (भाजप)

आंबोली पंचायत समिती: मायकल डिसोझा (शिवसेना)

वेंगुर्ले म्हापण पंचायत समिती: विष्णू फणसेकर (भाजप)

मालवण आचरा पंचायत समिती : दिपक सुर्वे (भाजप)

देवगड मुणगे पंचायत समिती : सदाशिव ओगले (भाजप)

देवगड तळवडे पंचायत समिती : सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)

देवगड पुरळ पंचायत समिती : संजना आळवे ( भाजप)

तळवडे पंचायत समिती : सुस्मिता जाधव (शिवसेना शिंदे गट)

मळगाव पंचायत समिती : गौरव मुळीक (भाजप)

परुळे पंचायत समिती : सचिन देसाई (शिवसेना शिंदे गट)

म्हापण पंचायत समिती : यज्ञा साळगावकर (शिवसेना शिंदे गट)

आडेली पंचायत समिती : नितीन मांजरेकर (अपक्ष)

भुईबावडा पंचायत समिती: देवानंद पालांडे (भाजप)

कोळपे पंचायत समिती सुवर्णा संसारे (भाजप)

खांबाळे पंचायत समिती मंगेश लोके (भाजप)

लोरे पंचायत समिती : भाजपचे सिध्देश रावराणे (भाजप)

उंबर्डे पंचायत समिती : भाजपचे साची कोलते (भाजप)

तिरलोट पंचायत समिती : रवी तिरलोटकर (भाजप)

माडखोल पंचायत समिती : अवनी राऊळ (अपक्ष)

आणखी वाचा

Sindhudurg ZP Election Result 2026: तळकोकणात राणे ब्रँडचीच हवा; कोकणी जनतेने ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारलं

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.