Prajakta Mali Viral Family Post: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्याची चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. अभिनयाच्यासह ती तिच्या नृत्यामुळे सुद्धा ओळखली जाते. हास्यजत्रेची सुत्रसंचलनामुळे देखील तिची चर्चा होताना पहायला मिळते. अभिनयाबरोबरच व्यावसायातही प्राजक्ताचं नाव आहे. 'प्राजक्तराज' नावाचा तिचा दागिन्याचा व्यवसाय आहे. प्राजक्ताच्या साधेपणाचं चाहत्यांना फार अप्रुप आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे दैनदिन अपडेट्स नेहमीच चाहत्यांना देत असते. तिच्यासोबत घडणाऱ्या वाईट-चांगल्या गोष्टी नेहमीच ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात तिने तिच्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केलाय. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आईवडिलांचं औक्षण करताना पहायला मिळतय. आई वडिलांच्या ४१ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहलं की, 'अभिनंदन आई-बाबा.. 41 वर्षं पूर्ण झाली… आणि अजूनही अनेक वर्षे यावीत. हीच खरी कपल गोल्स आहे' असं तिने म्हटलय.
View this post on InstagramA post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)
सध्या प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय. अनेकांनी प्राजक्ता वडिलांवर गेल्याचं म्हटलंय. अनेकांना तिच्या आई-बाबा कॉपी प्राजक्तामध्ये पहायला मिळालीय अनेकांनी कमेंट करत प्राजक्तासह आईवडिलांचं कौतूक केलय.
'मागच्या जन्मीचा शत्रू या जन्मीचा जोडीदार असतो' प्राजक्ता माळी प्रेमाबद्दल बोलताना म्हणाली...'खरं प्रेम हे...'