Nashik News : दिव्यांग मुलांच्या अभिनयाने रसिक भारावले; राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकच्याच तिन्ही संघांची बाजी
esakal February 13, 2026 03:45 AM

नाशिक: सातव्या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ नाटकाला प्रथम, महाराष्ट्र सेवा संघाच्या ‘चक्र’ नाटकाला द्वितीय, प्रबोधिनी ट्रस्टच्या ‘मोल अनमोल’ नाटकाने तृतीय क्रमांक मिळवीत अंतिम फेरीत राज्यभरात नाशिकच्या तिन्ही संघांनी बाजी मारली आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचनालय आयोजित ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या अंतिम स्पर्धेत बारापैकी नऊच नाटकांचे प्रयोग झाले होते, तर काही संघांनी स्पर्धेतून माघार घेतली होती. स्पर्धेचे परीक्षण गौरी लोंढे (पुणे), प्रवीण आहिरे (मुंबई), आकाश बाविस्कर (जळगाव) यांनी केले होते. स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, नाशिक केंद्राचे समन्वयक राजेश जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

स्पर्धेचा निकाल प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे असा

दिग्दर्शन : वर्षा साळुंखे (गुरुदक्षिणा), धनंजय वाबळे (चक्र), कांचन इप्पर (मोल अनमोल) प्रकाशयोजना : कृतार्थ कंसारा (चक्र), ललित श्रीवास्तव (गुरुदक्षिणा), विनोद राठोड (तमसो मा ज्योतिर्गमय) नेपथ्य : सरोज आहेर (मोल अनमोल), लता नायक (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड), समर्थ आगाशे (विठ्ठलास आमंत्रण) रंगभूषा : वैशाली लहरे (गुरुदक्षिणा), सुदर्शना पाटील (मोल अनमोल), मीनाक्षी बागल (चक्र) वेशभूषा : प्रमिला पालवे (गुरुदक्षिणा), निशा गायकवाड (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड), राजश्री कुलकर्णी (काव काव) संगीत : रोहित सरोदे (चक्र), ओम देशमुख (गुरुदक्षिणा), आशिष गाडे (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड) नाट्यलेखन : सुगंधा शुक्ल (गुरुदक्षिणा), स्वप्नील देशमुख (आम्ही काही कमी नाही), फुलवती आगाशे (विठ्ठलास आमंत्रण) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : हरीश परियार (तमसो मा ज्योतिर्गमय), सानिया खान (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड) अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : लकी (मैत्रीच्या दुनियेत), रेवती निन्माणे (विठ्ठलास आमंत्रण), प्रांशी तिवारी (चिमणी उड, कावळा उड, माणूस उड), अंकिता वाघमारे (विठ्ठलास आमंत्रण), सन्मकल काळे (मोल अनमोल), ओम सूर्यवंशी (काव काव), परेश सोनार (आम्ही काही कमी नाही), कुणाल सानप (चक्र)

MSRTC NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! NCMC असल्याशिवाय मिळणार नाही प्रवासात सवलत, कार्ड कसे मिळवायचे? जाणून घ्या प्रोसेस

स्पर्धेत बाहेरगावच्या संघांनी घेतली माघार

दिव्यांग बालनाट्य स्पर्धा जाहीर झाल्यानंतर राज्यभरातून १५ प्रवेशिका आल्या होत्या. त्यानंतर १९ जानेवारीपासून स्पर्धा जाहीर होताच १४ संघ होते. त्यापुढे बाहेरगावच्या संघांनी केंद्रावर येण्यास असमर्थता दर्शविल्याने २१ जानेवारीला होणारी स्पर्धा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्या वेळी १३ संघ शिल्लक राहिले होते. नाट्यगृह मिळण्यापासून ते तारखांची जुळवाजुळव करेपर्यंत ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या स्पर्धेत १३ पैकी अवघ्या नऊच संघांनी स्पर्धेत सादरीकरण केले.

हा आनंद शब्दांत व्यक्त करण्यासाठी नाही, पण मुलांनी नाटकांसाठी प्रचंड मेहनत घेतली होती, त्याचेच हे फळ आहे. स्पर्धेसाठी मुल गेल्या नोव्हेंबरपासून सराव करीत होते.

- वर्षा साळुंके, दिग्दर्शिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.