गौतमी पाटीलचा प्रायव्हेट VIDEO झाला होता व्हायरल, तिनं स्वत:ला कसं सावरलं? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
भाग्यश्री कांबळे February 14, 2026 04:13 PM

Gautami Patil Breaks Silence on Viral Private Video: सबसे कातिल गौतमी पाटील आतापर्यंत बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. कधी व्हिडिओ तर, कधी ट्रोलिंग. तिचा लावणी डान्सर होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.  आज तिच्या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतात. तरूणवर्ग कार्यक्रमात अक्षरश: धुडगूस घालतात. गौतमी एका प्रायव्हेट व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं तिचा प्रायव्हेट व्हिडिओ शूट करून व्हायरल केला होता.  हा व्हिडिओ व्हायरल होताच गौतमीला रातोरात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्या दिवशी नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीनं स्वत:ला कसं सावरलं? याबाबत तिनं एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये माहिती दिली.

"व्हिडिओ ज्या दिवशी व्हायरल झाला, तेव्हा मी माझ्या घरात होते. मी त्या क्षणी देवापुढे होते. मी देव पूजा करत होते. माझा बाहेर फोन वाजत होता. पूजा करत असल्यामुळे मी फोनकडे लक्ष दिले नाही.  पूजा केल्यानंतर मी बाहेर आले.  फोन पाहिला. तेव्हा मला प्रचंड धक्का बसला.  मला माझं एवढं टेन्शन नव्हतं, पण इतर पोरींचेही व्हिडिओ व्हायरल झाले आहे का? याचं मला टेन्शन होतं. मी त्यानंतर पोलीस चौकीत गले. मला या घटनेतून खूप शिकायला मिळालं", असं गौतमीनं सांगितलं. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीनं मानसिकरित्या स्वत:ला कसं सावरलं? या बाबत गौतमी म्हणाली, "हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी ठरवलं होतं की,  यानंतर कोणतेही कार्यक्रम करायचे नाही, मी हाच विचार केला. पण हा निर्णय मी घेऊ शकले नाही. त्यानंतरच्या कार्यक्रमात मी परफॉर्म कशी करू? असा सवाल माझ्यासमोर उभा होता. बऱ्याच ठिकाणी प्रेक्षक  बोलतात. हातवारे करतात. मला  कोणती गोष्ट पटली नाही तर, मी बोलते.  परंतु, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरची परिस्थिती अत्यंत वेगळी होती.  पण मी परफॉर्मन्स केला. प्रेक्षकांनीही उत्तम दाद दिली.  त्यांच्यामुळे मी पुढचे कार्यक्रम करू शकले. मी प्रेक्षकांना श्रेय देईन", असं गौतमी म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? नेमकं लग्न कधी करणार? तिला जोडीदार कसा हवा? ABPच्या पॉडकास्टमध्ये तिनं सगळंच सांगितलं..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.