कापूस धोरणाचा पाया ‘सघन कापूस लागवड पद्धत’; भारताला शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा 'अकोला पॅटर्न' नेमकं काय?
उमेश अलोणे, एबीपी माझा February 14, 2026 04:13 PM

Akola News : भारत कापूस उत्पादन क्षेत्रात नवी भरारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अनेक नवनवे प्रयोग देशभरात सुरु आहे. कापूस उत्पादनात भारताला पुन्हा शाश्वत नेतृत्व मिळवून देणारा एक प्रयोग अकोल्यात आकाराला येतोये. सघन कापूस लागवड पद्धत असं या नव्या प्रयोगाचं नाव. याच माध्यमातून संपूर्ण देशाच्या कापूस धोरणाचा पाया बनणारा 'अकोला पॅटर्न' (High Density Planting System - HDPS) आकाराला येतोये. कापसाच्या शेतीत क्रांतिकारी ठरणाऱ्या कापूस वेचणी यंत्राची निर्णय चाचणी निकाल अकोल्यात पार पडलीय.  या चाचणीनंतर पुढच्या काळात संपूर्ण भारतीय बनावटीच्या कापूस वेचणी यंत्रात अनेक निर्णय बदल करण्यात येणारायेत. (Akola Pattern In Cotton Cultivation)

30 ते 35 हजार झाडं लावून चक्क एकरी 18 क्विंटलपर्यंत कापूस

कापूस भारतातील महत्त्वाचं असं खरिपातलं पीक. जगात सर्वाधिक कापूस पिकवणारा देश म्हणजे भारत. पण उत्पादकतेच्या शर्यतीत मात्र आपण मागे आहोत. मात्र हीच ओळख पुसण्यासाठी आता भारतीय कृषी क्षेत्रात कापसाच्या बाबतीत अनेक नवनवे प्रयोग सुरूयेत. यातूनच अकोल्यात एका शेतकऱ्यानं सुरू केला एक नवा प्रयोग. ‘सघन कापूस लागवड पद्धत’, जिथं पारंपरिक एका एकरात 6 ते 7 हजार झाडं लावली जातात, तिथं अकोल्यातील दिलीप ठाकरे एकाच एकरात 30 ते 35 हजार झाडं लावून चक्क एकरी 18 क्विंटलपर्यंत कापूस घेतायत!

Cotton Cultivation : कापूस वेचणीत नवा प्रयोग; भारतीय बनावटीचे यंत्र, कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल

सध्या भारतीय शेतीला भेडसावत असलेला सर्वात मोठा प्रश्न हा मजुरांचा आहे. संपूर्ण देशभरात सध्या कापसाची वेचणी ही पारंपारिक पद्धतीने मजुरांच्या माध्यमातून केली जातेय. मात्र कापूस वेचणीत आता नवा प्रयोग आकार घेतोय. यालाच बळ देण्यासाठी संपूर्ण देशी बनावटीचे कापूस वेचणी यंत्र गुजरातमध्ये बनवलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या वेचणी यंत्राच्या अनेक चाचण्या प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर होतायेत. या व्यसनी यंत्राची दुसऱ्यांदा चाचणी काल अकोल्यातील मालवाडा गावातील दिलीप ठाकरे या शेतकऱ्याच्या शेतात करण्यात आलीय. पुढच्या काळात या यंत्रात अनेक बदल घडवत एक सक्षम कापूस वेचणी यंत्र प्रत्यक्षात उतरवण्यात येणारेय. भारतीय बनावटीचे कापूस वेचणी यंत्र हे कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणार असल्याच तज्ञांना वाटतंय.

आज देशातील 9 राज्यांत, पंजाबपासून तेलंगणापर्यंत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हेच मॉडेल राबवतायेत. कापूस लागवडीच्या या अकोला पॅटर्नला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराजसिंग यांनी मोठं बळ दिलंय. या खरीप हंगामात या पद्धतीने 20 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालीये. तर अकोला पॅटर्नने कापूस लागवडीचं क्षेत्र पुढच्या काळात देशभरात 25 लाख हेक्टरवर नेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न करतेय. पारंपरिक कापूस वेचण्याच्या पद्धतीला कापूस वेचणी यंत्र हे नव कोंदण लावणार आहेय.

'अकोला पॅटर्न’ VS पारंपरिक पद्धत:

सघन पद्धत:

20cm x 20cm अंतराने झाडं

एकरी 29 ते 40 हजार झाडं

योग्य वाण निवड (उभट वाढ, बुटके, कमी अंतरात बोंडं)

एकरी 15-18 क्विंटल उत्पादन

पारंपरिक पद्धत:

6-7 हजार झाडं एकरी

4-5 क्विंटल सरासरी उत्पादन

पावसावर आधारित, अनिश्चितता

बदलत्या जगात भारतीय कृषी क्षेत्राने बदलणे ही काळाची गरज आहेय. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचं यांत्रिकीकरण होणं तेवढंच गरजेचं आहेय. कापूस वेचणी यंत्र हा भारतीय कापूस शेतीतील बदलांचा एक मोठा लँडमार्क असणार आहेय, हे मात्र निश्चित!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.