इंदौर : इंदौर येथे एमबीए विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्येप्रकरणी (Crime News) तपासादरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी पियूषने ‘सरप्राइज गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने तरुणीला खोलीवर बोलावले आणि त्यानंतर अमानुष कृत्य केले, अशी माहिती पोलिस तपासात (Crime News) उघड झाली आहे. घटनास्थळाचे रीक्रिएशन करताना नव्या बाबी समोर आल्या असून आरोपीने तिच्या छातीवर चाकू तुटेपर्यंत वार केल्याचे निष्पन्न झाले आहे.(Crime News)
तपासानुसार, घटनेच्या दिवशी पियूषने तिला खोलीवर बोलावले. तिला ‘सरप्राइज गिफ्ट’ देण्याचे सांगून तिच्या डोळ्यांवर (Crime News) पट्टी बांधली. खोलीत आधीपासून ठेवलेल्या दोरी आणि चिकट टेपच्या सहाय्याने तिचे हात-पाय (Crime News) बांधले. स्वतःला बांधलेले पाहून तरुणीने विरोध केल्यावर आरोपीने तिच्या तोंडात कापड कोंबले. त्यानंतर तिच्या अंगावर बसून गळा आवळत तिला बेशुद्ध केले.(Crime News)
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीची क्रूरता यावरच थांबली नाही. तरुणीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी त्याने छातीवर चाकूने जोरदार वार केले. वार इतके तीव्र होते की चाकूचे टोक तुटून शरीरात अडकले. त्यानंतर आरोपी बाहेर जाऊन दारू घेऊन पुन्हा खोलीत परतला आणि मृतदेहाजवळ बसून त्याने दारू प्यायली. त्याने मृतदेहासोबतही गैरकृत्य केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून घटनास्थळावरून तुटलेला चाकू, दोरी, टेप आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात विद्यार्थिनीच्या मोबाईलवरील चॅट्सवरून आरोपीला संशय निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्याच संशयातून ही हत्या पूर्वनियोजित केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. १३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनीचा मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळून आला. हत्येनंतर आरोपी मुंबईला पळून गेला होता. १४ फेब्रुवारी रोजी त्याला अंधेरी परिसरातून अटक करण्यात आली.
तपासानुसार, मोबाईल चॅट्समुळे निर्माण झालेला संशय हे हत्येमागील प्रमुख कारण असू शकते. घटनेच्या दिवशी तरुणी घरातून आधारकार्ड दुरुस्त करण्याच्या कारणाने बाहेर पडली होती. नंतर तिने बहिणीला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असल्याचे सांगितले होते. रात्री उशिरापर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता तक्रार दाखल केली. काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडला आणि प्रकरण उघड झाले. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.