इन्फिनिक्सने भारतीय बाजारपेठेतील ग्राहकांसाठी एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. Infinix Note Edge 5G हा हँडसेट लाँच केला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 3D कर्व्ड, 1.5K AMOLED डिस्प्ले आणि मोठी 6500mAh बॅटरी समाविष्ट आहे. या डिव्हाइसला धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधकतेसाठी IP65 रेटिंग दिले आहे. त्यातच हा स्मार्टफोन ओल्या हाताचा किंवा पावसात पाण्यात टच करण्यास कार्यक्षमतेला समर्थन देते. JBL साउंडसह, फोनला तीन वर्षांचे OS अपडेट्स आणि पाच वर्षांचे सुरक्षा पॅचेस मिळतील. चला तर या धमाकेदार स्मार्टफोनची किंमत व फिचर्स जाणून घेऊयात.
इन्फिनिक्स नोट एज 5जी ची भारतातील किंमतहा 5 जी स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 6 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रूपये आहे तर 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 23 हजार 999 रूपये आहे आणि टॉप-एंड 8 जीबी/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 25 हजार 999 रूपये आहे. उपलब्धते बद्दल बोलायचे झाले तर हा फोन कंपनीच्या वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.
लाँच ऑफर्समध्ये SBI आणि ICICI बँक कार्ड वापरण्यासाठी 2 हजार रूपयांची इन्स्टंट बँक सूट समाविष्ट आहे. सवलतीनंतर हे मॉडेल 19 हजार 999 रूपये , 21 हजार 999 रूपये आणि 23 हजार 999 मध्ये उपलब्ध असतील.
इन्फिनिक्स नोट एज 5जी पर्यायस्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर हा फोन OnePlus Nord CE5 5G, Realme 14 Pro+ 5G, Vivo T4 5G आणि OPPO K13 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.
इन्फिनिक्स नोट एज 5जी स्पेसिफिकेशन्सस्क्रीन: फोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 4500 निट्स आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i वापरला जातो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेकंडरी कॅमेरा सेन्सर आहे. फोनमध्ये लाईव्ह फोटोज आणि एआय इरेजर सारख्या एआय टूल्स सारख्या फीचर्सना देखील सपोर्ट करतो. यात अॅक्टिव्ह हॅलो लाइटिंगसह सिग्नेचर कॅमेरा मॉड्यूल देखील आहे जो नोटिफिकेशन्स, कॉल्स आणि म्युझिकसाठी कस्टमाइझ केला जाऊ शकतो. सेल्फीसाठी यात 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.
बॅटरी क्षमता: 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.