सातारा: शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्याचा आग्रह आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून सदस्यांची भूमिका सांगितली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या युतीबाबत पुढील निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत, तरीही जिल्हा परिषद निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीची असणारी युती निवडणुकीनंतरही कायम ठेवण्यावर आम्ही ठाम असल्याची भूमिका आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मंत्री नितीन गडकरींचे सोलापूरला गिफ्ट! भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळणूर महामार्गासाठी ३५३ कोटी; ४७ किमीचा रस्ता आता होणार १२ मीटरचा..श्री. देसाई म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने ताकदीने चांगल्या जागा निवडून आणल्या. या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली, तरी ज्यांना जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्षे उत्तम काम करायचे आहे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यायचे आहे, त्यांच्यासोबत जाण्याची आमची स्पष्ट इच्छा आहे. सत्तेत आल्यानंतर लोकांची कामे प्रामाणिकपणे करत न्याय दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तर आपण निवडणुका लढतो. निकालानंतर आमच्या १५ जागा निवडून आल्या असून, मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू. सत्तेत सहभागी होताना तांत्रिक बाबींमध्ये शिवसेना पक्षाने मला व्हीपचा अधिकार दिला आहे.’’
दोन दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शंभूराज देसाई यांना मिठी मारायची आहे, असे वक्तव्य केले होते. यावर आम्हाला मिठी मारायला बोलविले तर जाणार... असे सांगत श्री. देसाई यांनी भाजपवरच अप्रत्यक्ष निशाणा साधला.
पालिका निवडणुकीत अपमानराज्यात महायुतीची सत्ता असल्याने आम्ही प्रत्येक निवडणूक एकत्र लढविण्याचा आग्रह धरत होतो. त्यासाठी नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत आम्ही संपर्क केला होता. मात्र, शिवसेनेला भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. तशीच परिस्थिती जिल्हा परिषद निवडणुकीत झाल्याने आम्ही सावध पावले टाकत असल्याचे सांगत शंभूराज देसाई यांनी शिवसेनेची भाजपसोबत युती करण्याची इच्छा नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली.
Chhatrapati Sambhajinagar: चाळीस प्रवाशांचे दहा तास हाल! नागपूर-मुंबई बस हर्सूल टोलजवळ बंद, महिला-मुले रात्रभर थंडीत कुडकुडले.. दोघांच्या मधोमध चालताना भीती वाटतेशिवजयंतीनिमित्त आज साताऱ्यात गांधी मैदानावरून सुरू झालेल्या पदयात्रेत चालताना एका बाजूला शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे चालत होते. मला मधोमध चालण्यास सांगितल्यानंतर खरंतर मला भीती वाटली होती, अशी कोपरखळीही श्री. देसाई यांनी भाजपच्या दोन्ही नेत्यांना मारली.