व्हायरल व्हिडीओ किंग म्स्वाती तृतीय खाजगी जेटमध्ये चढताना दिसत आहेत. त्यांनी पारंपारिक पोशाख घातला आहे. त्यांच्या मागे त्यांच्या १५ बायका आणि मुले दिसत आहेत. यावर अनेकांनी टीका केलेली आहे. या देशात अजून मोठ्या लोकसंख्येला वीज आणि स्वच्छ पाणी प्यायला नाही . परंतू राजाच्या शाही कुटुंबाची ऐषोराम सुरु आहे.
Eswatini आफ्रीकेतील असा देश आहे जेथे एचआयव्ही आणि एड्सचे प्रमाण खूप जास्त आहे. आरोग्य आणि रोजगाराचे आव्हान मोठे आहे. मात्र राजाच्या आलिशान जीवन शैली पाहून जनतेच्या समस्यांची त्याला काही काळजी आहे असे दिसत नाही. राजा म्स्वाती तृतीय हा १९८६ मध्ये अठरा वर्षांचा असताना गादीवर बसला. आजही ते आफ्रीकेतील अखेरच संपूर्ण राजेशाही शासन म्हणून ओळखले जातात. त्यांना व्यापक राजकीय अधिकार आणि न्यायालयांवर वचक आहे.
संपत्तीचे शाही प्रदर्शन?हा व्हिडीओ साल २०२२ चा आहे. जेव्हा संयुक्त अरब अमिरात आर्थिक सहकार्यासाठी बोलणी करण्यासाठी दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी स्थानिक मीडियाने याचे वार्तांकन करताना ही एक धोरणात्मक बैठक असल्याचे म्हटले होते. या दौऱ्याचा हेतू गुंतवणूक आणि आर्थिक भागिदारी वाढवणे हा होता.परंतू डिजिटल युगात फोटो आणि व्हिडीओ असली कहानी सांगतात.त्यांच्या १५ बायकांच्या विशाल कुटुंबाचा आणि शाही अंदाजाच्या राहणीमानाचा थाटबाट पाहून हा एखाद्या गरीबी आणि एड्सने पीडलेल्या देशाचा राजा आहे असे वाटत नाही.
येथे पाहा पोस्ट –
His Majesty King Mswati III has jetted out of the country on an official State business trip to Abu Dhabi. He will also travel to the Republic of China on Taiwan before attending the official coronation of King Misuzulu-KaZwelithini on October 29, 2022 in South Africa. pic.twitter.com/HpolPtpIB1
— Times Of Eswatini (@TimesOfEswatinE)