Ranji Trophy 2025-26: जम्मू काश्मीर विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी कर्नाटक संघाची घोषणा
Tv9 Marathi February 21, 2026 05:45 AM

रणजी ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच जम्मू काश्मीरने धडक मारली आहे. तर 11 वर्षानंतर कर्नाटकने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा असणार आहे. उपांत्य फेरीत कर्नाटक आणि उत्तराखंड सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावात कर्नाटकडे मोठी आघाडी होती. त्यामुळे अंतिम फेरीचं तिकीट कर्नाटकला मिळालं आहे. 24 फेब्रुवारीपासून हुबळी येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात कर्नाटकचा सामना जम्मू काश्मीरशी होणार आहे. अंतिम सामन्यासाठी कर्नाटक संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच उपांत्य फेरीत खेळलेला संघच अंतिम फेरीत खेळणार आहे. त्यामुळे संघ मजबूत आहे. कारण केएल राहुल, मयंक अग्रवाल यासारखे तगडे खेळाडू आहेत.

केएल राहुल आणि मयंक अग्रवाल डावाची सुरूवात करतील. तसेच करूण नायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी उतरेल. तर देवदत्त पडिकल चौथ्या क्रमांकावर असेल. खरं या तगड्या फलंदाजांमुळे कर्नाटकची बाजू भक्कम आहे. उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात याची प्रचिती आली. कर्णधार देवदत्त पडिकलने द्विशतक झळकावले, तर केएल राहुल आणि स्मरण रविचंद्रन यांनी शतके झळकावली. कृतिक कृष्णा आणि विद्याधर पाटील यांनी अर्धशतके झळकावून संघाला साथ दिली. त्यामुळे कर्नाटकचे फलंदाज फॉर्माक आहेत आणि अंतिम सामन्यातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ಜಮ್ಮು & ಕಾಶ್ಮೀರ ವಿರುದ್ಧದ ಫೈನಲ್ ಪಂದ್ಯಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡ.
Karnataka squad for final match against Jammu & Kashmir.

No changes in the squad.#RanjiTrophy pic.twitter.com/4atXPjLXCc

— Karnataka Sports Fans (@karnataka_sport)

कर्नाटक गोलंदाजी विभागातही मजबूत आहे. उपांत्य फेरीत विद्याधर पाटील आणि विजयकुमार विशाक यांनी यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. तर श्रेयस गोपाळच्या फिरकीची जादू चालली आहे. शिखर शेट्टी आणि प्रसीद कृष्णा यांनीही गोलंदाजीत कमाल केली आहे. त्यामुळे सर्वात पातळ्यांवर कर्नाटकचा संघ मजबूत स्थितीत आहे.

कर्नाटक संघ: केएल राहुल, मयंक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल(कर्णधार), करुण नायर, स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, कृतिक कृष्णा(विकेटकीपर), विद्याधर पाटील, शिखर शेट्टी, प्रसिद्ध कृष्णा, विद्वत कवेरप्पा, अनीश केव्ही, मोहसीन खान, मुरलीधर वेंकटेश, कृष्णन श्रीजिथ, ध्रुव प्रभाकर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.