'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका
esakal February 21, 2026 11:46 PM

Entertainment News : ‘भूत बंगला’ हा 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची ‘ओजी’ जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची तब्बल 16 वर्षांनंतर होणारी दमदार पुनरागमन. Balaji Motion Picturesच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

या प्रतिक्षेत आणखी भर घालत अक्षय कुमार यांनी नुकतेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये एका नव्या नावाची भर घातली आहे मिथिला पालकर. अक्षय यांनी सांगितले की, मिथिला या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणार आहेत. या फ्रेश कास्टिंगमुळे कथेत एक नवा ट्विस्ट आला असून, आता चाहत्यांना या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

अक्षय कुमार म्हणाले, “मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. आणि लवकरच ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखतो — ओळखा पाहू कोण? मी स्वतः! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला ‘भूत’ नाही, तर माझ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.”

चाहत्यांमध्ये ‘भूत बंगला’बद्दल प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट केवळ अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे पुनरागमनच नाही, तर एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे. यात भरपूर विनोद, मजेशीर गोंधळ आणि भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अक्षय कुमार त्यांचा जुना अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसह पाहण्याची अपेक्षा आहे, तर प्रियदर्शन यांचा खास देसी टच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका गब्बी,परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर आहेत. तयार राहा — ‘भूत बंगला’ 10 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहांत येणार आहे!

राजर्षी शाहू महाराजांची वंशज आहे ही बॉलिवूड अभिनेत्री ! क्रिकेटरशी लग्न आणि स्वतः राष्ट्रीय हॉकीपटू
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.