तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 20 हजार रुपयांमध्ये सौदा ठरला होता. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने तहसीलदरा व्यंकटेश मुंडे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
साताऱ्यातील कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना मुंढे गावातून पोलिसांनी अटक केल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मु़ंढे गावातील सह्याद्री रेसिडेन्सीमधून या चौघांना ताब्यात घेण्यात आले. हे बांगलादेशी नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही वैध कागदपत्रे नसताना वास्तव्य करत होते. बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मूळचे बांगलादेशातील विष्णुपूर (जि. कालिया, नोडाईल) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
गळफास घेताना साडी फाटल्याने थोडक्यात बचावले, शिंदेंच्या बीड तालुका उपप्रमुखाचा आत्महत्येचा प्रयत्न