'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; पण कुटुंबीयांनी कळवलंच नाही, कारण...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 22, 2026 10:43 AM

Deepali Sayyad Mother In Law Passed Away: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच ऐन सीझन रंगात आलेला असतानाच आता घरातील एका सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात एकदा एन्ट्री घेतली की, स्पर्धकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. अशातच सुप्रसिद्ध अभिनेत्री, राजकारणी आणि बिग बॉसच्या घरातील चर्चेत असणारी सदस्या दिपाली सय्यद हिच्या सासुचं निधन झालं आहे. दिपाली सय्यद (Deepali Sayyad) सध्या बिग बॉसच्या घरात आहे आणि ती चांगली खेळत असल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी ही दुःखद घटना तिला सांगितली नाही. याबाबत दिपाली सय्यदच्या पतीनं स्वतः माहिती दिली. 

काही दिवसांपूर्वी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिपाली सय्यदचे पती आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉबी खान (Famous Choreographer Bobby Khan) यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या दुःखद घटनेबाबत सांगितलं. 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन 11 जानेवारी रोजी सुरू झालेला आणि त्यानंतर काहीच दिवसांत म्हणजेच, 2 फेब्रुवारी रोजी दिपाली सय्यदच्या सासुचं निधन झालं. पण, दिपालीला तिच्या घरच्यांनी या दुःखद घटनेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. दिपाली तिच्या सासुबाईंच्या खुपच जवळ होती. जर, तिच्यापर्यंत ही दुःखद बातमी पोहोचली असती, तर ती पूर्णपणे खचून गेली असती आणि तिनं घराबाहेर येण्यासाठी प्रयत्न केले असते. तिनं पाहिलेलं स्वप्न अर्धवट राहिलं असतं, म्हणून दिपालीपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी ही दुःखद बातमी पोहोचवली नाही, असं तिचे पती बॉबी खान यांनी सांगितलं. 

दिपाली सय्यद नेमकं काय म्हणाली?

दीपाली सय्यदचे पती म्हणाले की, "हल्लीच माझी आई वारली आणि ती दीपालीच्या खूप जवळची होती. ती दीपालीला मुलगीच मानायची. माझी आई नेहमी म्हणायची, तू बिग बॉस जिंकल्यावर मी नक्की येईन. आम्ही तिला नाही सांगितलं कारण, ती खूप चांगलं खेळतेय. खेळासोबतच जे झालं ते झालं. माझ्या आईला नेहमीच दीपालीची साथ लागायची. डॉक्टरकडे जायचं असेल तर ती दीपालीलाच घेऊन जायची."

"म्हणूनच आता मी तिला मिस करतोय, कारण सगळे निर्णय मलाच घ्यावे लागतायत. माझी आई 2 फेब्रुवारीला वारली, म्हणून आम्ही दीपालीला सांगितलं नाही. तिला हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसेल. जेव्हा आई शेवटी शेवटी काही बोलायची नाही, तेव्हा मी तिला दीपालीचा आवाज ऐकवायचो. आम्हाला नव्हतं वाटलं, कारण दोनवेळा आई ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये आणि आई आलेली परत. यावेळी पण असंच वाटलेलं, म्हणून मी नाही सांगितलं. दीपालीने कायम पुढे जावं अशी माझ्या आईची इच्छा होती...", असं दिपाली सय्यदचे पती म्हणाले. 

Bigg Boss Marathi 6: राखीच्या खेळीने ‘काटा गँग’मध्ये भूकंप; तन्वीने साथ सोडली, प्रभूला बघून राखीही ढसाढसा रडली, नेमकं घडलं काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.