जाहिरातीमुळे गमावले ७९ लाख
मुंबई, ता. २१ ः आभासी चलनात गुंतवणूक केल्यास भरघोस फायदा करून देऊ, या इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीस भुलून पूर्व उपनगरातील व्यावसायिकाने तब्बल ७९ लाख रुपये गमावले. याप्रकरणी गेल्या आठवड्यात सायबर पोलिस ठाण्यात (पूर्व विभाग) गुन्हा नोंद करण्यात आला. ४१ वर्षीय तक्रारदाराने जाहिरातीवर क्लिक करताच ते आपोआप एका व्हॉट्सॲप समूहात सहभागी झाले. त्यावर गुंतवणुकीबाबत चर्चा, वेगवेगळ्या योजनांची माहितीची देवाणघेवाण सुरू होती. विश्वास बसल्याने त्यांनी टप्प्याटप्याने गुंतवणूक केली. त्यावर झालेला नफा त्या कंपनीने सुरू केलेल्या वॉलेट अकाउंटमध्ये दिसत होता. तो काढून घेण्याचा प्रयत्ना तेव्हा त्याला १८ लाख भरण्यास सांगण्यात आले. तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.